बिग बॉसच्या मागच्या पर्वात अभिजीत बिचुकले हे सर्वात वादग्रस्त आणि चर्चित स्पर्धक ठरला होता. या शाेमध्ये अभिजीत बिचुकलेंच्या करामती चांगल्याच गाजल्या होत्या. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. यावेळी अभिजित बिचुकले यांनी 28 नाेव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे. आहे काय नेमकं प्रकरण? चला जाणून घेऊया…
तर झाले असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat shingh koshyaris) यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र राज्यात राजकीय वातावरण तापले यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले. माजी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र बंद ठेवण्याबद्दल ठरवू असे म्हटले हाेते. यानंतर बिग बाॅसचे माजी स्पर्धक आणि हाय प्राेफाईन नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजित बिचुकले (abhijit bichukales) यांनी 28 नोव्हेंबरला सातारा बंद ठेवण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.
अभिजित बिचुकले म्हणाले, “शिवाजी महाराजांची कोश्यारी यांनी जी काही तुलना केली, ती शुल्लक लाेकांशी केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लायकी नसलेल्यांची तुलना करणे म्हणजे महराजांचा अपमान आहे. यामुळे मी समस्त सातारकरांना अवाहन करताेय की, येत्या 28 नाेव्हेंबरला माझा वाढदिवस आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवस निमित्त सातारा जिल्हा बंद ठेवावा अशी माझी ईच्छा आहे.”
अभिजित बिचुकले पुढे म्हणाले, “अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत पक्ष वाढवला. आता त्याच पक्षांतील काही संविधानिक पदावरील व्यक्ती महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करत असेल, तर मी शांत बसणार नाही. या पुढे असे कोणी वक्तव्य केल्यास मी खपवून घेणर नाही.” अशा इशाराही त्यांनी दिला.
अभिजित बिचुकले यांच्याविषयी बाेलायचे झाले, तर ते सामाजिक कार्यकर्ता आणि राजकिय नेता याच्या व्यतिरिक्त कलाकार, लेखक, कवि, गायक आणि संगीतकार आहे. ( satara closed on november 28 abhijit bichukales appeal on bhagat shingh koshyaris statement)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागराज मंजुळे उतरणार ‘कुस्ती’च्या आखाड्यात, रुपेरी पडद्यावर झळकणार महाराष्ट्राचं वैभव
‘नात्यासाठी आम्हाला कागदाच्या तुकड्याची गरज नाही’, लग्नाबाबत अर्जुन रामपालचे मोठे वक्तव्य