टीव्हीवरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील ‘गोपी बहू’ भूमिकेने लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टाचार्जी. ती देखील इतर अभिनेत्रींप्रमाणे खूप चर्चेत असते. मागच्या वर्षी ‘बिग बॉस 14’ मध्ये तिने खुलासा केला होता की, ती कोणासोबत तरी डेट करत आहे. यानंतर तिचे चाहते खूप हैराण झाले होते, कारण ती कधीच तिचे वैयक्तिक आयुष्य शेअर करत नाही.
तिने नुकत्याच तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती लवकरच बोहल्यावर चढणार आहे. जेव्हा अभिनेत्रीला तिच्या पार्टनरचे नाव विचारले, तेव्हा तिने नाव सांगायला थेट नकार दिला. तसेच नाव न सांगण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे.
देवोलीनाने एका मुलाखतीत सांगितले की, “आम्ही दोघे याच वर्षी लग्न करणार होतो. पण आता आम्ही तारीख पुढे ढकलली आहे आणि आता आम्ही पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत. मी आता हा कोरोना संपायची वाट बघत आहे. जेणेकरून आम्हाला प्लॅनिंग करता येईल. मी माझ्या रिलेशन बाबत खूप खुश आहे. मी माझं आयुष्य आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी खूप वेळ लावत आहे. माझा पार्टनर खूप समजदार आहे. परंतु आता येणाऱ्या काळात काय होईल हे कोणालाही माहिती नाहीये. तसं पण मी कोणत्याही गोष्टी लपवत नाही. लग्नाचा निर्णय झाला की, मी लगेच सांगणार आहे.”
देवोलीनाला जेव्हा तिच्या पार्टनरचे नाव विचारले, तेव्हा तिने नाव सांगण्यास नकार दिला. ती म्हणाली की, “मी सध्या माझ्या पार्टनरचे नाव सांगण्यास तयार नाहीये. त्याला देखील आता त्याचे नाव समोर आलेले आवडणार नाही, कारण तो इंडस्ट्री मधला नाहीये. जर सर्वांना त्याचे नाव समजले, तर सगळे त्याला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतील जे मला नकोय. त्यामुळे सध्या मी काहीच सांगू शकत नाही.”
‘साथ निभाना साथिया’ या मालिकेचा प्रिक्वेल येणार आहे, तर ती त्याचा भाग असणार आहे का?? जेव्हा तिला हा प्रश्न विचारला तेव्हा तिने उत्तर दिले की, “मी साथ निभाना साथिया 2 चा भाग असणार आहे. यासाठी मला अजून कोणीही अप्रोच केले नाही. पण खरं सांगायचं तर मला याबाबत कोणतीच माहिती नाहीये.”
तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल तिने सांगितले की, “माझ्याकडे वेबसाठी अनेक प्रोजेक्ट आहेत. परंतु कोरोनामुळे सगळे पुढे ढकलण्यात आले आहेत. परंतु 15 जूनपासून सगळे प्रोजेक्ट सुरू होतील अशी मला आशा आहे.”
देवोलीनाने ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे सोशल मीडियावर २० लाखांपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ गोष्टीला मिस करतेय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित; फोटो शेअर करत म्हणाली, ‘परत…’
-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम गोड गोंडस अक्षया नाईकचा जबरदस्त डान्स पाहून, तुम्हीही कराल कौतुक
-‘स्त्री प्रत्येक रूपात चमकू शकते!’ प्रिया मराठेने शेअर केलेल्या व्हिडिओचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक