समंथासोबत पुन्हा चित्रपटात दिसणार नागा चैतन्य! अभिनेता म्हणाला…

साऊथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात तो दिसणार आहे. काही काळापूर्वी नागा चैतन्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त प्रसिद्धीझोतात आला होता. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या वर्षी वेगळे झाले. तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. अलीकडेच नागा चैतन्य पुन्हा समंथासोबत काम करणार असल्याची रंगली आहे.

खरं तर, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडायची, त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांचेच मन तुटले. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर चैतन्य आणि समंथा यांनी २०१७ मध्ये लग्न केले. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते आणि अलीकडेच चैतन्यने स्वत: सांगितले की, त्याची सर्वात जास्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री समंथासोबत आहे. (naga chaitanya talks about if he is going to work with samantha)

एका मुलाखतीदरम्यान जेव्हा नागा चैतन्यला विचारण्यात आले की, तो आणि समंथा लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार का? यावर हसून तो म्हणाले की, “असे झाले तर ते एकदम क्रेझी असेल. पण हे मला माहीत नाही, फक्त विश्वालाच माहीत आहे. बघू पुढे काय होते ते.” मात्र, दोघांचे ऑनस्क्रीन रीयूनियन कदाचित सोपे नसेल. कारण समंथाने अलीकडेच ‘कॉफी विथ करण ७’ वर कबूल केले की, सध्या दोघांमध्ये काही चांगले नाही.

त्याचवेळी, नागा चैतन्यने आणखी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “मी जे काही चित्रपट करतो त्यापेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त गोंगाट सुरू आहे. हे दुर्दैवी आहे. पण वेळ अशी आहे आणि माध्यमातील काहीजण असेच वार्तांकन करत आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे मार्ग आहेत, म्हणून ते ठीक आहे.”
चैतन्यचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्टला रिलीझ होणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चे अधिकृत रूपांतर आहे. यात आमिर खान आणि करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित आहे.
हेही वाचा

Latest Post