बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार आणि विनोदी अभिनेते म्हणजे सतीश कौशिक. कौशिक यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक विनोदी तसेच काहीवेळा गंभीर पात्रे साकारली आहेत. आज आपण या लेखात त्यांच्याबद्दल बोलणार आहोत.
सतिश कौशिक यांनी 1983 मध्ये ‘मौसम’ चित्रपटातून त्यांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी चित्रपटात एकापेक्षा एक चांगल्या भूमिका निभावून त्यांचे एक अढळ स्थान निर्माण केले. 13 एप्रिलला कौशिक यांचा वाढदिवस असतो. यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांनी भुमिका केलेले काही विनोदी चित्रपट ज्यामुळे त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीला खदखदून हसवले होते.
- साजन चले ससुराल….
साजन चले ससुराल या चित्रपटात सतीश यांनी ‘मुत्तू स्वामी’ नावाच्या व्यक्तीची भूमिका निभावली होती. या चित्रपटात जेव्हा सतीश कौशिक दिसायचे, त्यावेळी प्रेक्षक हसून हसून लोटपोट होत असायचे. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सतीश कौशल हे अभिनेता गोविंदा याच्या मित्राच्या भूमिकेत दिसले होते.
- मिस्टर अँड मिसेस खिलाडी….
सन 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिस्टर अँड मिसेस खिलाडी या चित्रपटात सतीश कौशिक यांनी अक्षय कुमार याच्या मामाचे पात्र निभावले होते. या चित्रपटात ते अक्षय कुमारला असं सांगतात की, तुझ्या पत्रिकेत राज योग आहे. चित्रपटातील त्यांचेही विनोदी पात्र प्रेक्षकांना खूपच आवडलं होतं. आणि प्रेक्षकांनी अभिनयाला भरभरून दाद दिली होती.
- हसीना मान जाएगी…
हसीना मान जाएगी या विनोदी चित्रपटात यांनी कादर खान यांच्या पर्सनल सेक्रेटरीचे काम केले होते. प्रत्येक वाक्यात त्यांच्याकडून येणाऱ्या विनोदाला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. त्यांच्या या चित्रपटाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
- मिस्टर इंडिया…
सन 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटात सतीश कौशिक यांनी कॅलेंडर नावाच्या एका आचाऱ्याची भूमिका निभावली होती. अनिल कपूर, श्रीदेवी, अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात सतीश कौशिक यांचे विनोदी पात्र सगळ्यांना खूप आवडले होते.
- क्योंकी मै झूट नही बोलता…
डेविड धवन यांच्या या विनोदी चित्रपटात गोविंदा आणि सुष्मिता सेन यांच्या सोबत सतीश कौशिक यांनी गोविंदाच्या मित्राचे पात्र निभावले होते, जो वकील असतो. या चित्रपटात त्यांनी केवळ विनोद नाही केला, तर त्यांच्या पात्रात हे दाखवून दिले की, मित्र नक्की कसा असायला हवा.