देशभरात सध्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात सध्या आनंदाचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोशल मीडियावर तिरंगाच तिरंगा दिसत आहे. सामान्य लोकांपासून सिने कलाकारांनीही त्यांचे डिपी बदलून तिरंग्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ठेवले आहेत. अभिनेते सतिश शाह (Satish Shah) यांनीही एक तिरंग्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सतिश शहा हे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्यांनी सिने जगतात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सतिश शहा सोशल मीडियावरही चांगलेच प्रसिद्ध असतात. नुकताच त्यांनी एक तिरंग्याचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टिका होताना दिसत आहे.
वास्तविक, 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांच्या आईला मिळालेला तोच फोटो आहे, असा दावा करत अभिनेते सतीश शाह यांनी स्वत:कडे भारतीय झेंडा हातात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळेच त्यांच्यावर ट्विटरवर टीका होत आहे. कारण नेटकऱ्यांनी त्यांना 1942 मध्ये तिरंग्यावर अशोक चक्राऐवजी चरखा हे चिन्ह असायचे. त्यामुळे त्यांचा हा दावा खोटे असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.
The very same TIRANGA DHWAJ my mother had got during Quit India Movement 1942 pic.twitter.com/gIk64iOCnY
— satish shah???????? (@sats45) August 9, 2022
शाह यांनी अनेक प्रशंसित बॉलीवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. कॉमिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, या अभिनेत्याने कभी हा कभी ना, हम आपके है कौन, कहो ना प्यार है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.
हेही वाचा –
Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू
काय लॉजिक आहे राव! यामुळे राकेश रोशन त्यांच्या चित्रपटांची नावे ‘के’ अक्षरावरुन ठेवतात