Thursday, April 18, 2024

वाढदिवस विशेष | दिग्दर्शकाने कट म्हणूनही एकमेकांत हरवले होते जॅकलीन आणि टायगर, नॉनस्टॉप करत राहिले किस

 जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)  ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनांक ( ११ ऑगस्ट) रोजी जॅकलीन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळेच तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अभिनयाइतकीच विविध किस्स्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या जॅकलीनचा फ्लाईंग जट हा चित्रपटा चांगलाच गाजला होता. याच चित्रपटातील जॅकलीनचा एक किस्सा चांगलाच गाजला होता. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कॉमेडी नाईट्स कार्यक्रमात जॅकलीन फर्नांडिस, रेमो डिसूझा, आणि टायगर श्रॉफ सहभागी झाली होते. ते तिघेही त्यांच्या ‘फ्लाइंग जेट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात गेले होते. यावेळी चित्रपटासंदर्भात अनेक मजेशीर किस्से त्यांनी ऐकवले. याच चित्रपटातील एक किसींग सीन करतानाचा मजेशीर किस्सा रेमो डिसूझा यांनी सांगितला आहे. या सीनमध्ये जॅकलीन आणि टायगरला आपले ओठ जवळ आणत किस करायचे होते. त्यांना सीन समजावून सांगून दिग्दर्शक शूटिंग करायला लागले. मात्र जॅकलीन आणि टायगर इतके हरवून गेले की, त्यांनी एकमेकांना किस करायला सुरुवात केली. रेमो डिसूझाने कट म्हणले तरी दोघे किस करत राहिले. या सगळ्या प्रकरणावरून त्यांना अनेक दिवस चिडवण्यात आले होते.

जॅकलीन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफचा ‘फ्लाइंग जेट’ चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही, मात्र त्यामधील किस्से आजही चर्चेत असतात. हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नसला, तरी चित्रपटातील जॅकलीन आणि टायगरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा