ठरलं तर! जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ प्रदर्शित होणार ‘या’ दिवशी


मागील वर्षी कोरोनामुळे मनोरंजनसृष्टीला खूप मोठा फटका बसला. अनेक चित्रपटांचे शूटिंग रद्द झाले तर काही प्रदर्शनासाठी सज्ज असलेले सिनेमे प्रदर्शित झालेच नाही. आता हळूहळू कोरोनाचा कहर कमी होत असताना आणि थोड्या थोड्या स्वरूपात शूटिंग चालू होताना यावर्षी अनेक बिग बजेट आणि मोठ्या कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. नुकतीच सलमान खानने त्याच्या ‘राधे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जॉन अब्राहमने देखील त्याच्या ‘सत्यमेव जयते २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सत्यमेव जयते २’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर केली आहे. जॉनने त्याचा पांढरा ड्रेस, पांढरा फेटा घातलेला आणि हातात तिरंगा घेतलेला एक रुबाबदार फोटो पोस्ट करत लिहिले की, ” “तन मन धन से बढकर जन गण मन..सत्यमेव जयतेच्या संपूर्ण परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग भेटू ईदच्या दिवशी १४ मे २०२१ ला”,

सत्यमेव जयते २ आणि सलमान खानचा राधे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. दोन मोठया चित्रपटाची ही टक्कर नक्कीच पाहण्याजोगी ठरणार आहे. हा सिनेमा त्याच्या पूर्वनियोजित तारखेनुसार म्हणजेच २०२० मध्ये प्रदर्शित झाला असता तर, या सिनेमाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या सिनेमासोबत झाली असती.

सत्यमेव जयते २ हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते या सिनेमाच सिक्वल आहे. ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबत या सिनेमात दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच जॉनने त्याच्या सिनेमाचे पाहिले पोस्टर शेयर केले होते. त्यावर पोस्टर लिहिले होते की, “जिस देश की मैया गंगा है, वहां खून भी तिरंगा है.” या चित्रपटाच्या शूटिंगवेळी जॉनला दुखापत देखील झाली होती. आता मे महिन्याच्या १४ तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. प्रेक्षक कोणत्या सिनेमाला स्वीकारतात आणि कोणत्या सिनेमाला नाकारतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.