कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा‘ रिलीजच्या तयारीत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशात आता कार्तिक आर्यन आणि कियाराचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. खरे तर, कार्तिक आणि कियारा यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘सत्यप्रेम की कथा’चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे दाेघेही चांगलेच चर्चेत आले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
कार्तिक आर्यन (kartik aaryan) आणि कियारा अडवाणी (kiara advani) हिचा हा फोटो सोशल मीडियावर समोर येताच चांंगलाच व्हायरल हाेत आहे. काही लोकांना वाटले की, कार्तिकने लग्न केले आहे आणि तो थेट इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना सांगत आहे. यासाेबतच कियाराच्या अकाऊंटवरही अशाच प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या, ज्यानंतर तिने ती पोस्ट डिलीट केली आहे. कार्तिक आर्यनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “सुरुवातीला मी गोंधळून गेलो.” तर दुसरा म्हणाला, “मला वाटले कार्तिक लग्न बंधनात अडकला, मिनी हार्ट अटॅक.”
View this post on Instagram
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या या फोटोवर काही चाहत्यांनी सिद्धार्थ मल्होत्राचे नाव घेत मजेदार कमेंट्स केल्या. एका युजरने म्हटले, “भाऊ, आता या पोस्टवर सिद्धार्थचा कॉपीराइट येईल.”,तर दुसरा युजर्सने कमेंट करत लिहिले, “सिद्धार्थ म्हणत असेल – गद्दारी करबे…”
View this post on Instagram
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट या वर्षी 29 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे, तर निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.(satyaprem ki katha kartik aaryan kiara advani wedding photo from film)
अधिक वाचा –
–आणखी काय हवं! ‘बिग बाॅस 16’नंतर पालटलं शिव ठाकरेचं नशीब, वाचा नेमकं घडलंय तरी काय
–‘प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं… ‘, ‘आठवणी’चे पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला