Tuesday, June 18, 2024

‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर रिलीज, कार्तिक-कियाराची केमिस्ट्री भिडली चाहत्यांच्या हृदयाला

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात कार्तिक आणि कियारा यांची जोडी हृदयाला भिडणारी आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कार्तिक एका अशा भूमिकेत दिसत आहे, ज्याला लग्नासाठी मुलगी सापडत नाही. दरम्यान, त्याला कियारा सापडते. मात्र, ट्रेलरमध्ये कियारा दुसऱ्यासोबत लग्न करत असल्याचे दिसत आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणार असल्याचे दिसत आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ (satyaprem ki katha) या चित्रपटात कार्तिक आर्यन (kartik aaryan) आणि कियारा अडवाणी (kiara advani)मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातद्वारे दोघांची जोडी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याआधी दाेघेही ‘भूल-भुलैया 2’मध्ये दिसले हाेते, ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली हाेती. ट्रेलरच्या सुरुवातीला कार्तिक कियारासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे, तर पुढच्या सीनमध्ये तो एका अशा मुलाच्या भूमिकेत दिसतो जो घरातील सर्व कामे करतो, पण लग्नासाठी मुलगी शोधू शकत नाही. तिसर्‍या सीनमध्ये हा चित्रपट कॉमेडीने भरलेला असल्याचे पाहायला मिळत आहे, तर ट्रेलरच्या चौथ्या भागात अॅक्शन दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच रोमांचक असून यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विधानांनी केले आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त गजराज राव आणि सुप्रिया पाठक सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (satyaprem ki katha trailer release )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल

नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

हे देखील वाचा