लस घेऊनही कमल हासन यांना कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करून म्हणाले, ‘महामारी अजून संपली नाही’

अभिनेता कमल हासन यांच्याबाबत एक मोठी बातमी समीर आली आहे. कमल हासन हे कोरोना संक्रमित झाले आहेत. ते नुकतेच यूएस ट्रीपवरून परत आले आहे. त्यांना थोडीशी सर्दी झाली होती. त्यानंतर त्यांनी टेस्ट केली, तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी ही बातमी ट्विटरवर दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की, ही महामारी अजूनही संपली नाही. त्यांची काळजी घ्या. कमल हासन यांनी कोरोना लस घेतली आहे.

अभिनेत्याने लिहिले आहे की, “माझ्या अमेरिका यात्रेनंतर मला सर्दी आणि खोकला झाला. चाचणी केल्यानंतर मला समजले की मला कोरोना झाला आहे. मी विलिगीकरणात आहे. मला हे जाणवले आहे की, ही महामारी अजूनही संपली नाही. मी सगळ्यांना विनंती करतो काळजी घ्या.” कमल हासन यांनी दिलेल्या या बातमीनंतर सगळे त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. (Sauth superstar kamal haasan corona positive, give information on social media)

कमल हासन या दिवसात त्यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत विजय सेतू पती आणि फाहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. कमल हासन यांनी त्यांच्या वाढदिवशी या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. त्यांच्या चाहत्यांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

कमल हासन यांनी त्यांच्या अभिनयाने साऊथ आणि बॉलिवूडमध्ये देखील एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांनी १९६० मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्यांची मुलगी श्रुती हासन हिने देखील बॉलिवूड आणि साऊथमध्ये काम करुन तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…