Thursday, June 12, 2025
Home मराठी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर सायली संजीवने खरेदी केली चार चाकी गाडी, फोटो झाले व्हायरल

लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर सायली संजीवने खरेदी केली चार चाकी गाडी, फोटो झाले व्हायरल

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. यादिवशी सगळेजण त्यांच्या घरात असलेल्या लक्ष्मीची पूजा करतात. तसेच अनेकजण या दिवशी काही नवीन खरेदी करत असतात. अशातच मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर तिची नवीन चार चाकी गाडी खरेदी केली आहे. ही गोड बातमी माहिती तिने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दिली आहे.

सायलीने तिच्या नवीन गाडीसोबत फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सायली तिच्या नवीन गाडीसोबत उभी राहिलेली दिसत आहे. तिने कुर्ता घातलेला दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती गाडीमधील गणेशाची पूजा करताना दिसत आहे. (Sayali sanjeev buy four wheeler on occasion of laxmipoojan)

हे फोटो शेअर करून तिने हे “सगळे एका स्वप्नापासून सुरू झाले आहे.” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार देखील कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहे. या फोटोवर स्पृहा जोशी, सलील कुलकर्णी, सुयश टिळक, अन्विता फलटणकर, ऋतुजा बागवे, सुबोध भावे, हार्दिक जोशी यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स करून तिचे अभिनंदन केले आहे.

सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायलीने कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम केले आहे. या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. लवकरच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा