रविवारी (दि. १४ ऑगस्ट) भारतातील प्रसिद्ध गुंतवणुकदार आणि शेअर मार्केटचे ‘बिग बुल’ म्हटले जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. रविवारी सकाळी आलेल्या या बातमीने सर्वांच्या पायाखालची जमीन घसरली. झुनझुनवाला यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर आता चर्चा सुरू झाली की, व्यावसायिक जगतातील या दिग्गज व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित कोणता सिनेमा किंवा वेबसीरिज बनला आहे की नाही. तर याचे उत्तर आहे हो. झुनझुनवाला यांचे पात्र अभिनेता कविन दवे याने एका वेबसीरिजमध्ये साकारले आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या भूमिकेत झळकला होता कविन दवे
विशेष म्हणजे, कविन दवे (Kavin Dave) हा अभिनेता हिंदी सिनेसृष्टीतील त्याच्या लहान-मोठ्या पात्रांसाठी ओळखला जातो. शेअर मार्केटचे ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची भूमिका साकारून कविन एकाच रात्रीत प्रसिद्ध झाला होता. खरं तर कविनने बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेबसीरिजमध्ये ‘राकेश’ हे पात्र साकारले होते. मात्र, या वेबसीरिजमध्ये झुनझुनवाला यांच्या भूमिकेत कविनची छोटीशी भूमिका होती. तेवढ्या भूमिकेतही त्याने झुनझुनवाला यांची भूमिका लीलया पार पाडली.
View this post on Instagram
राकेश झुनझुनवाला यांची भूमिका साकारल्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यासोबतच कविन याचा लूक हा अगदी झुनझुनवाला यांच्यासारखाच दिसला होता. अशात झुनझुनवाला यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर कविन याच्या या पात्राची चर्चा सुरू झाली.
View this post on Instagram
सलमानसोबतही शेअर केलीये स्क्रीन शेअर
प्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पात्रासोबतच कविन दवे याने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. या यादीत सर्वात मोठे नाव आहे हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या सिनेमात कविन हा सलमानसोबत मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील कविनच्या कॉमेडीने सर्वांची मने जिंकली होती. सध्या कविन हा अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘केस तो बनता है’ या शोमध्ये दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे श्वेता तिवारी, ताफ्यात महागड्या गाड्यांचाही समावेश
आता तर ऋतिक रोशनही म्हणाला, ‘आमिर खानचा सिनेमा म्हणजे, एकदम…’
अरेरे! ब्रा न घालताच कार्यक्रमात पोहोचली प्रियांका चोप्रा, कॅमेऱ्यासमोरचं झाली ‘अशी’ फजिती