Thursday, March 28, 2024

राकेश झुनझुनवाला यांचे बॉलिवूडशी आहे खास नाते, ‘या’ चित्रपटांत गुंतवला होता पैसा

शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली. रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक होते. पण तुम्हाला माहीत आहे का, की त्याचे बॉलिवूडशीही चांगले कनेक्शन आहे.

इंडस्ट्रीत पैशांची कमतरता नसल्यामुळे इंडस्ट्रीशी निगडित लोक एका वेळी चित्रपटांकडे येतात. कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक राकेश झुनझुनवाला २०१२ साली या उद्योगात आले होते, हे फार लोकांना माहीत नाही. २०१२ मध्ये रिलीज झालेला ‘इंग्लिश-विंग्लिश’ राकेश झुनझुनवाला निर्मित होता, ज्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) दिसली होती. २६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाल केली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ७८ .५७ कोटी आहे.

‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर राकेश झुनझुनवाला यांनी ‘शमिताभ’ आणि ‘की अँड का’ या आणखी दोन चित्रपटांची निर्मिती केली. ‘शमिताभ’मध्ये अमिताभ बच्चन,(Amitabh Bachchan) धनुष आणि अक्षरा हासन यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी ‘की अंक का’मध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि करीना कपूरची (Kareena Kapoor) जोडी दिसली होती. जवळपास ५२ कोटींची कमाई करून हा चित्रपट हिट ठरला होता.

कॉलेजच्या दिवसातच झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये हात आजमावायला सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये दाखल झाले. त्यांनी १९८५ मध्ये पहिली गुंतवणूक केली आणि ती ५,००० रुपये होती. २०१८ पर्यंत ही गुंतवणूक ११,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ४३ .३९ हजार कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

केवळ अभिनयासाठी नाही तर डान्ससाठी देखील प्रसिद्ध होते शम्मी कपूर, या आजाराने त्यांचा जीव घेतला
‘देवों कें देव महादेव’ बनून घराघरांत पोहोचला मोहित रैना, जाणून घ्या काही रंजक किस्से…
मनोज बाजपेयी यांची विसरलेली चप्पल पंकज त्रिपाठीने का ठेवली होती सांभाळून?, कारण वाचून तुम्हालाही कोसळेल रडू

 

हे देखील वाचा