Monday, June 24, 2024

कोण आहे इंद्राणी रहमान? स्विमसूटवर टिकली लावून अन् गजरा माळून, मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत जिंकली मने

71 वर्षांपूर्वी म्हणजेच 1952 मध्ये पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरू झाली. तेव्हापासून आजतापर्यंत ही स्पर्धा दरवर्षी जगातील सौंदर्यवतींना सन्मानित करते. 1952 साली भारताची दुसरी मिस इंडिया ठरलेल्या इंद्राणी रहमानला या स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. त्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या देशात येऊ शकला नाही, पण इंद्राणी रहमानने ताे पराक्रम केला, ज्यानंतर त्या खूप प्रसिद्ध झाल्या.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली.आपल्या उत्तम व्यक्तिमत्त्वाने आणि एथनिक ड्रेसअपने जगाचे लक्ष वेधून घेणारी इंद्राणी रहमान त्यावेळी अवघ्या 22 वर्षांची हाेत्या.

या स्पर्धेत जगातील सुंदर महिलांनी सहभाग घेतला होता. सौंदर्याच्या स्त्रीयांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत इंद्राणी रहमानचे आगमन एका खास पद्धतीने झाले. त्यादरम्यान इंद्राणीने रॅम्प वॉक केला तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि बोल्ड स्टाइल पाहण्यासारखी होती. यासोबतच स्विमसूट राऊंडमध्ये इंद्राणी यांनी गजरा आणि बिंदी परिधान केली तेव्हा त्यांचे फॅशन कॉम्बिनेशनने सर्वांना प्रभावित केले.

इंद्राणीचे वैयक्तिक आयुष्यही खूप रजंक होते. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी पळून जाऊन 30 वर्षीय हबीब रहमानशी लग्न केले. हबीब रहमान हे त्या काळातील प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. इंद्राणी यांना दोन मुले होती, मुलगा राम रहमान आणि मुलगी सुकन्या रेहमान.

इंद्राणी रहमान एक अप्रतिम शास्त्रीय नृत्यांगना होत्या. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथकली आणि ओडिसी या चार प्रकारच्या नृत्य प्रकारात त्या निपुण होत्या. या स्पर्धेनंतरही त्याने आपली नृत्याची आवड कमी होऊ दिली नाही. त्यांनी त्यांच्या  आईसोबत संपूर्ण जगाचा दौरा केला, जेणेकरून त्यांना नृत्याच्या विविध शास्त्रीय प्रकारांची माहिती मिळू शकेल. 1961 मध्ये, इंद्राणी एशिया सोसायटी टूरमध्ये सहभागी होणारी पहिली नृत्यांगना हाेत्या. नृत्यशैलीबद्दलच्या त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमामुळे त्यांना 1969 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 1981 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, याशिवाय त्यांना तारकनाथ दास पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.(second miss india indrani rahman applied gajra bindi with swimsuit in missu niverse contest in 1952 )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिसायला अगदी सेम टू सेम अनुपम खेर यांचे मोठे बंधू राजू; टीव्ही-मालिकांमध्ये केले काम, परंतु…

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले होते शाहिद अन् करीना, मात्र ‘या’ व्यक्तीमुळे गेले नात्याला तडे!

हे देखील वाचा