Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड जेव्हा वहिदा रहमानला भेटण्यासाठी झाली हाेती दगडफेक; राज कपूर यांना रोखणेही झाले होते कठीण

जेव्हा वहिदा रहमानला भेटण्यासाठी झाली हाेती दगडफेक; राज कपूर यांना रोखणेही झाले होते कठीण

सन 70-80 च्या दशकात बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे आजही लोकांना पाहायला आवडतात. त्याकाळी आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष पाहण्याची लोकांमध्ये वेगळीच क्रेझ असायची. त्यामुळे अनेकवेळा सेटवर अपघात व्हायचे. असाच काहीसा प्रकार त्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकार असलेल्या वहिदा रहमान यांच्या बाबतीत घडला. ‘द इनव्हिन्सिबल्स विथ अरबाज खान’मध्ये या दिग्गज अभिनेत्रीने अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी एकदा जनतेने कशी दगडफेक केली होती हे सांगितले.

वहिदा रहमान (waheeda rehman) त्यांच्या चित्रपटातील कलाकारांसोबत प्रवास करत असतानाची ही घटना आहे. ‘द इनव्हिन्सिबल्स विथ अरबाज खान’मध्ये, अभिनेत्रीने हा इंसिडेट शेअर करत सांगितले की, “त्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत राज कपूर आणि युनिटचे इतर सदस्य उपस्थित होते. त्या म्हणाल्या, ज्या दिवशी आम्ही जाणार होतो, त्या वेळी आम्हाला ट्रेनने यावे लागले. राज कपूर आणि त्यांचे मित्र एका डब्यात होते, तर दुसऱ्या डब्यात मी, माझी बहीण आणि हेयरड्रेसर हाेती. अशात गाडी सुरू होऊन अचानक थांबली.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेव्हा आम्ही पडदा उघडून डोकावून पाहिले, तेव्हा खूप लोक जमले होते. एका मुलाने सांगितले की, मला राज साहेबांना भेटायचे आहे. राज कपूर यांनी चाहत्यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. खरे तर, त्यानंतर त्यांनी राज कपूर यांना वहिदा रहमान यांना भेटायचे असल्याचे सांगितले. पण राज कपूर यांनी नकार दिला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज कपूर यांनी सांगितले की, “ते सुरक्षित नाही. जर त्यांनी ओढून नेले तर.” वहिदा रहमान यांनी सांगितले की, “राज कपूर यांनी हे सांगताच ते म्हणाले की, ‘असे कसे ओढून नेले जाईल.’ त्यांना भेटू न दिल्याने त्या मुलांना इतका राग आला की, तिथे दगडफेक सुरू झाली. यावर राजसाहेब संतापले. आधीच ते गाेरे अन् राग आल्यावर ते टोमॅटोसारखा लाल झाले. आम्हाला भीती वाटली की, त्याचे हार्ट फेल झाले तर, म्हणून आम्ही तीन महिलांनी त्याला धरले आणि त्यांच्या रागावर नियंत्रिण आणले. असे किस्सा वहिदा रहमान यांनी अरबाज खान यांच्या शाेमध्ये सांगितला. (bollywood actress waheeda rehman shares incident about dangerous encounter with fans in the invincibles with arbaaz khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंत तिसऱ्यांदा अडकणार ‘या’ कलाकारासाेबत लग्न बंधनात?, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले होते शाहिद अन् करीना, मात्र ‘या’ व्यक्तीमुळे गेले नात्याला तडे!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा