‘…राग गरजेचा असतो!’, म्हणत अमेय वाघची ब्लॅक ऍंड व्हाईट पोस्ट होतेय व्हायरल


‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतून यातील सर्वच कलाकार घराघरात पोहचले. यातलाच एक कलाकार म्हणजे, अभिनेता अमेय वाघ होय. यातील त्याचं ‘कैवल्य’ हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं. कैवल्य बनून त्याने चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

आता अमेय सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय राहतो. या ठिकाणी त्याचे वेगवेगळे फोटो शेअर करून, तो चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करतो. त्याच्या फोटोखालचे कॅप्शन विशेषतः नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो देखील आता चर्चेत आला आहे. (see amey wagh’s interesting post goes viral_

त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहे, ज्यात अमेयने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. सोबतच तो पियानोच्या जवळ उभा राहून, फोटोसाठी पोझ देताना दिसतोय. हा फोटो शेअर करून अमेय म्हणतोय की, “वाईट संगीत कानावर पडलं की मला राग येतो! आणि एखादा चांगला राग ऐकून मी शांत होतो ! राग गरजेचा असतो!” सोबतच त्याने ‘वाघचास्वॅग’ असं हॅशटॅगही दिलं आहे. चाहत्यांना देखील हे कॅप्शन खूपच पसंत पडलंय. ते फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये कॅप्शनवर हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री ऋतुजा बागवेने देखील या फोटोवर हसण्याचे ईमोजी पोस्ट केले आहेत.

अमेयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने विविध माध्यमातून चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट शिवाय वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला आहे. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ या चित्रपटातील अमेयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. अभिनेता लवकरच ‘झोंबिवली’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.