Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल

‘चला हवा येऊ द्या’ हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीला पात्र ठरत आहे. थुकरटवाडीतील हे सदस्य रसिकांचे भरभरून मनोरंजन करतात. परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि यातील कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशाल बद्रिके, सागर कारंडे आणि भाऊ कदम ही मंडळी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडते. यात आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे अंकुर वाढवे याचं. अगदी कमी कालावधीत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ऑनस्क्रीन तर यांची धमाल आपल्याला पाहायला मिळतेच, मात्र ऑफस्क्रीन देखील त्यांची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे. असाच शोच्या सेटवरून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात शोचा होस्ट निलेश साबळे आणि अंकुर वाढवे यांच्यात झालेला मजेदार संवाद पाहायला मिळत आहे.

हा मजेदार व्हिडिओ झी मराठीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, निलेश साबळे हा अंकुरचे केस बनवत आहे. तेव्हा अंकुर म्हणतो की, “सर तुम्ही माझे केस बनवताय?” यावर निलेश म्हणतो, “नाही नाही. आम्ही तुमच्यासाठी एवढे पंच लिहितो ते नक्की जातात कुठे हे शोधतोय.” पुढे तो म्हणतो, “कोण बनलाय तू आज?” तर अंकुर म्हणतो, “डाकू.” हे ऐकताच निलेश “पॅकअप” म्हणून तिथून निघून जातो. (see nilesh sable and ankur wadhaves popatchampi from set)

त्यांचा हा मजेदार संवाद नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पोपटचंपी’ असं लिहिलेलं आहे. ऑफस्क्रीन देखील हे कलाकार चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कुठलीही कसर सोडत नाहीत. अंकुर वाढवेबद्दल बोलायचे झाले, तर तो अभिनेत्यासोबत एक कवी देखील आहे. तसेच त्याने ‘करून गेलो गाव’, ‘गाढवाचं लग्न’, ‘सर्किट हाऊस’, ‘आम्ही सारे फर्स्ट क्लास’, ‘सायलेन्स’ आणि कन्हैया’ या नाटकात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा