राजेश्वरी खरात एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटाद्वारे शालू अर्थातच, राजेश्वरी खरातने आपली विशेष ओळख निर्माण केली. चित्रपटात शालू जितकी गाजली तितकीच ती सोशल मीडिया प्रसिद्ध असल्याचे दिसते. शालू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. व्हिडिओ सोबतच तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजेश्वरीने पुन्हा तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती साडीमध्ये पाहायला मिळाली आहे. या फुलांची डिझाइन असलेल्या स्टायलिश साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. परफेक्ट मेकअप आणि परफेक्ट अशी हेअर स्टाईल शालूच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. तिच्या आजूबाजूला हिरवळ दिसत आहे. बागेत बसून शालू फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तसेच या लूकमध्ये ती बऱ्यापैकी ग्लॅमरस दिसत आहे.
हा फोटो शेअर करत राजेश्वरी कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “हो सके तो थोडा प्यार जता दे.” असे म्हणत तिने लाल हार्ट ईमोजी देखील बनवला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा फोटो नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवाय यावर फोटो आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. राजेश्वरी सतत तिचे असे ग्लॅमरस फोटो शेअर करून, चाहत्यांना घायाळ करत असते.
यापूर्वी तिने याच लूकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती फोटोशूटसाठी तयार होताना दिसली होती. विशेष म्हणजे हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती
-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज
-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल