Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड घटस्फोटाच्या बातमीनंतर सीमा सचदेवने दिला सोहेल खानला मोठा धक्का, सोशल मीडियावरुन हटवले खान आडनाव

घटस्फोटाच्या बातमीनंतर सीमा सचदेवने दिला सोहेल खानला मोठा धक्का, सोशल मीडियावरुन हटवले खान आडनाव

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खानच्या (Arbaj Khan) घटस्फोटानंतर सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानही (sohel khan) त्याची पत्नी सीमा सचदेव खानला (seema khan)घटस्फोट देणार आहे. लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघांचा वेगळे होण्याचा हा निर्णय लोकांना धक्का देणारा आहे. अलीकडेच दोघांनी घटस्फोटासाठी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. या दोघांचे कोर्टाबाहेरचे फोटो व्हायरल झाले त्यानंतरच ही बातमी आगीसारखी पसरली. मात्र, दोघांनी हा निर्णय का घेतला, हे अद्याप गुपितच आहे. मात्र घटस्फोटापूर्वी सीमा सचदेव खानने घेतलेल्या एका निर्णयाने सगळ्यांनाच थक्क केले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव खान हे दोघेही सध्या वेगळे राहत आहेत. ते घटस्फोट घेऊन 24 वर्षांचे नाते संपवण्याचा प्रयत्न का करत आहेत हा प्रश्न अजूनही कायम आहे, पण घटस्फोटापूर्वीच सीमा खानने मोठे पाऊल उचलत नावासमोरचे आडनाव बदलले आहे. सीमाने तिच्या नावातून ‘खान’ हे आडनाव वगळले आहे. सीमा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नाव बदलून ‘सीमा किरण सचदेव’ केले आहे. हेच ती लग्नाआधी पूर्ण नाव लिहायची. सीमाच्या निर्णयामुळे आता तिने स्वतःला खान कुटुंब आणि सोहेल खानपासून पूर्णपणे वेगळे केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीमा आणि सोहेलची पहिली भेट चंकी पांडेच्या एंगेजमेंट पार्टीत झाली होती. सोहेल आणि सीमा यांचे धर्म भिन्न असल्यामुळे त्यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. सीमाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याने दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. मात्र इतकी सुंदर लवस्टोरी असतानाच त्यांचा हा निर्णय प्रत्येकालाचं धक्का देणार आहे. मात्र बॉलिवूडच्या जगतात ब्रेकअपचा विषय काही नवीन राहिलेला नाही.याआधीही अशाच प्रकारे अनेक कलाकारांनी अशाच प्रकारे सुखी संसाराचे नाते संपवत सर्वांनाच चकित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा