×

कमाईच्या बाबतीत सोहेल खानला देखील तगडी टक्कर देते सीमा खान, ‘या’ व्यवसायातून मिळते उत्पन्न

बॉलिवूडचा अभिनेता आणि निर्माता असलेला सोहेल खान लवकरच त्याच्या पत्नीपासून सीमा खानपासून घटस्फोट घेणार आहे. नुकताच या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तब्बल २४ वर्षांचा मोठा संसार त्यांनी मोडीत काढल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्यानंतर सोहेल आणि सीमा घटस्फोट घेणार आहेत. सोहेल खानची पत्नी सीमा खान नेहमीच लाइमलाईटपासून दूर असली तरी ती संपत्तीच्या बाबतीत सोहेल खानला चांगलीच टक्कर देते. सीमा खान कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. जाणून घेऊया तिच्या संपत्तीबद्दल आणि तिच्या व्यवसायाबद्दल.

View this post on Instagram

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

सीमा खान कोट्यवधी संपत्तीची मालकीण असून तिचे एक फॅशनलेबल देखील आहे. सीमा तिच्या मैत्रिणी असलेल्या सुजेन खान आणि महिप कपूरसोबत मिळून तिचे फॅशन स्टोर चालवते. तिच्या या फॅशन स्टोरचे नाव आहे ‘बांद्रा 190 ‘. सोहेल खान जरी सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. रिपोर्ट्सनुसार सोहेल खान १०९ कोटी संपत्तीचा मालक असून तो त्याच्या व्यवसायातून पैसा कमवतो. सोहेलचा फिटनेस इक्वेंटमेंटचा बिजनेस असून त्याचे नाव ‘बिइंग फिट जिम इक्विपमेंट’ आहे.

View this post on Instagram

A post shared by Seema Khan (@seemakhan76)

सोहेल खान आणि सीमा खान यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिला असून, मागील काही काळापासून ते वेगळे राहत आहे. दोघांनी १९९८ साली लग्न केले होते. या दोघांना निरवान आणि योहान अशी दोन मुलं असून, ‘द फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या शोमध्ये सीमा दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post