Sunday, January 26, 2025
Home मराठी ‘आई कुठे काय करते!’ फेम संजना सोडणार मालिका? दिसणार ‘या’ नवीन प्रोजेक्टमध्ये

‘आई कुठे काय करते!’ फेम संजना सोडणार मालिका? दिसणार ‘या’ नवीन प्रोजेक्टमध्ये

मराठी मनोरंजन क्षेत्रात मालिकांनी आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. सध्या चालू असलेल्या मालिकांपैकी आई कुठे काय करते! या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खूप मोठे स्थान बनवले आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली आहे. या मालिकेत ‘संजना’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मालिका सोडण्याच्या बेतात असल्याचे बोलले जात आहे. तिला नवीन हिंदी प्रोजेक्ट मिळाला आहे. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टमध्ये ती एका अभिनेत्यासोबत रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. याची माहिती तिच्या एका फॅन पेजवरून देण्यात आली आहे.

संजना ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले होय. रुपालीची खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली आहे. रुपाली आता हिंदी मालिकेतील एका अभिनेत्यासोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

रुपालीच्या फॅन पेजवरून सांगण्यात आले आहे की, अभिनेत्री ‘तुझसे ही राबता’ (Tujhse Hai Raabta) फेम सेहबान अझीमबरोबर (Sehban Azim) ‘जीव झाला मोगरा’ (Jeev Zala Mogra) या मराठी म्युझिक अल्बमसाठी एकत्र येणार आहे. सेहबान ‘तुझसे ही राबता’ मालिकेतील एसीपी मल्हार राणे या भूमिकेतून घराघरात पोहोचला. असे असले, तरीही रुपालीने अधिकृतरीत्या काहीही सांगितले नाही.

हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय

‘बिग बॉस मराठी’मधून प्रेक्षकांसमोर आलेली रुपाली भोसले नंतर ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. खलनायिकेची व्यक्तिरेखा असून सुद्धा ती प्रेक्षकांना जास्त भावली. या भूमिकेने तिला तिचा नवीन चाहतावर्ग दिला. आपल्या अभिनय कौशल्याने तिने ती भूमिका योग्यरीत्या साकारली. रुपाली म्हणते तिला अनेक नवनवीन भूमिका करायच्या आहेत. मराठी म्युझिक अल्बमचे आलेली ही संधी न सोडता ती देखील स्वीकारली आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा