जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

Selena Gomez realeased new song selfish love with dj snack


हॉलिवूड अभिनेत्री ‘सेलेना गोमेझ’ ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यावरून तिला नेहमीच ट्रोल केले जाते. ती आपल्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे.

सेलेनाने आपले ‘सेल्फिश लव्ह’ हे गाणे चाहत्यांच्या भेटीला आणले आहे. या गाण्यासाठी ती पुन्हा एकदा ‘डीजे स्नेक’ याच्यासोबत काम करत आहे. या आधी सेलेनाने ‘ताकी ताकी’ या गाण्यासाठी डीजे स्नेक याच्यासोबत काम केले होते. सेलेनाचे हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर खूपच धमाल करत आहे. हे गाणे डीजे स्नेकच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले असून या गाण्याला ३ दिवसात ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सेलेनाच्या या नव्या गाण्यात तिने एक यूनिसेक्स सलून उघडले आहे. ज्यामध्ये अनेक मुलं हेअर ट्रीटमेंटसाठी येतात. परंतु त्यामध्ये अनेक विचित्र घटना घडतात. सेलेनाचे हे नवीन गाणे पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता ‘रॉड्रिगो सवेंद्रा’ यांनी दिग्दर्शित केले आहे.

सेलेना नेहमीच आपल्या अफेअर्समुळे चर्चेत असते. ती जेव्हा जस्टीन बिबर याच्यासोबत रिलेशनमध्ये होती, तेव्हा प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सोशल मीडियावर चर्चेत असायची. त्या दोघांच्या ब्रेकअप नंतरही त्या दोघांच्या बातम्या येत असायच्या. जस्टीन हा आता विवाहित आहे, तरी देखील अनेक वेळा त्या दोघांचं नाव एकत्र जोडलं जात. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये सेलेनाने सांगितले की, “जस्टिन सोबत राहणे हे मला एक इमोशनल टॉर्चर वाटत होतं, पण त्याच्यापासून लांब होऊन मी आयुष्यातल्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.