Monday, June 17, 2024

श्रीदेवी यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर? बोनी कपूर यांनी दाखवला रेड सिग्नल, म्हणाले…

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाही, पण कोणालाही जाणवत नाही. कारण श्रीदेवी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. श्रीदेवीचे अनेक हिट चित्रपट आहे. जे पाहिल्यानंतर श्रीदेवीच्या चाहत्यांना वाटत की आजही श्रीदेवी जीवंत आहेत. बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, श्रीदेवी यांचे पती आणि बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांनी यापूर्वी श्रीदेवी यांच्या बायोपिकसाठी नकार दिला होता. आता बोनी कपूर यांनी याबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.

नुकताच एका मुलाखतीत बोलताना बोनी कपूर (Boney Kapoor) म्हणाले, “श्रीदेवी यांचे आयुष्यावर बायोपिक बनवणं हा माझा वैयक्तिक विषय आहे. तिची आणि माझी लव्ह स्टोरी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. आम्ही ते फक्त आमच्यासाठीच ठेवू इच्छितो. त्यामुळे श्रीदेवी यांच्या बायोपिकसाठी मी कधीही परवानगी देणार नाही.”

बोनी कपूर पुढे म्हणाले, “श्रीदेवी यांची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक चांगल्या आई आणि पत्नी म्हणूनही होती. त्यांचे आयुष्य खूप समृद्ध होते. त्यांची कहाणी फक्त एका सिनेमात किंवा पुस्तकात मांडणे शक्य नाही. त्यामुळे मी असे काहीही करणार नाही जे त्यांची ओळख कमी करेल.”

बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे श्रीदेवी यांचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांना वाटते की श्रीदेवी यांचे आयुष्य इतरांना प्रेरणा देणारे आहे. त्यांची कहाणी अनेकांना मदत करू शकते. त्यामुळे श्रीदेवी यांच्या बायोपिकसाठी परवानगी देणे योग्य ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

श्रीदेवी यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ‘सोलहवा सावना’,’हिम्मतवाला’,’मवाली’,’तोहवा’,’नगीना’, ‘घर संसार’,’आखिरी रास्ता’,’कर्मा’,’मि.इंडिया’ या सोबत अनेक चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला आहे. त्या कामासाठी त्यांना भारतसरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (Boney Kapoor refuses to make a biopic on late actress Sridevi life)

आधिक वाचा-
नागराज मंजुळेंच्या नवीन चित्रपटाचं चांगभलं! सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, फोटो शेअर करत दिली माहिती
नाद करा पण गौतमीचा कुठं… सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या ‘घुंगरू’चं पहिलं पोस्टर आऊट

हे देखील वाचा