Thursday, March 13, 2025
Home मराठी ‘सर, तुमचं काम लै नादखुळा असतं…’, अभिनेते किरण मानेंची पोस्ट जोरदार चर्चेत

‘सर, तुमचं काम लै नादखुळा असतं…’, अभिनेते किरण मानेंची पोस्ट जोरदार चर्चेत

कलाकारांसाठी फॅन्सचे मिळणारे प्रेम हा सर्वात मोठा आणि अवर्णनीय असा अनुभव आहे. फॅन्सचे भरभरून प्रेम मिळणे आणि ओळख मिळवणे हे सर्वांचेच स्वप्न असते. फॅन्सचे प्रेम कलाकारांसाठी अमूल्य असा ठेवा असतो, हा ठेवा जसा मिळवता येतो तसेच तो टिकवता देखील आला पाहिजे. जेव्हा फॅन्स येऊन आपले काम आवडत असल्याची पोचपावती देतात तेव्हा जी भावना असते ती कधीच शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. फॅन्सच्या प्रेमाचा असाच एक अनुभव आला आहे अभिनेते किरण माने यांना.

स्टार प्रवाहावरील सर्वात जास्त गाजत असणाऱ्या मालिकेपैकी एक असणारी मालिका म्हणजे ‘मुलगी झाली हो.’ ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या मालिकेतील माऊचे अर्थात साजिरीचे वडील ही भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. किरण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते नेहमीच त्यांचे अनुभव, मतं मांडत असतात. फॅन्सच्या प्रेमाचा असाच एक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किरण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “काल रात्री १२.३० / १ वाजता पोवई नाक्यावर एकटा फिरत असताना पाचसहा पोरं “विलास पाटीSSSSल… विलास पाटीSSSSSSSल” असं आनंदानं वरडत आली. …मध्यरात्री गाडी काढून सातारच्या सुनसान रस्त्यांवरनं फिरनं ह्यो माझा आवडता छंद! …शुटिंगमधनं सुट्टी मिळाल्यावर पयला सातारा गाठतो मी. रात्री जेवन झाल्यावर मध्यरात्री नाक्यावर नायतर राजवाड्यावर गाडी लावायची…आन् रिकाम्या, शांत, निवांत पहुडलेल्या वरच्या आनि खालच्या रोडवरनं चालत फिरन्यात जे सुख हाय त्याचा नाद नाय करायचा.. जगात भारी भावांनो !!
असाच फिरत असताना काही पोरांनी मला बघितलं आन् गराडा घातला… “सर, तुमचं काम लै नादखुळा असतं.. माझी आई तुमची लै मोट्टी फॅन हाय. प्लीज तिच्याशी व्हिडीओकाॅलवर बोला. ती तुमाला बगून येडीच हुईल.”…मी म्हन्लं, “अरे एवढ्या रात्री कशाला उठवतोयस आईला?”…”नाय नाय सर, आता सुट्टी नाय.” असं म्हनत कुनी आईला झोपेतनं उठवुन सांगीतलं, “आई, मला कोन भेटलं बघ.”… तिकडून “आगंबयाSS ईलास पाटील?! नमस्कार ओ. तुमचा कार्यक्रम लै आवडतो आमाला.” वगैरे सुरू झालं. मग कुनाच्या बहिनीशी, कुनाच्या वडिलांशी बोलून झालं…”सर तुमी सापडत नाय कधी..आता घावलाय तर सुट्टी नाय तुमाला.”

…सेल्फी वगैरे झाल्यावर निरोप घेताना पोरांनी हात पुढे केले. म्हन्ले “सर, ऑटोग्राफ द्या.”.. म्हन्लं, “हातावर?”.. म्हन्ले, “मंग? आता सुट्टी नाय.”… ऑटोग्राफ दिला.. म्हन्ले, “नाय, खाली ‘विलास पाटील’ लिहा.”.. लिहून टाकलं.. त्याशिवाय ‘सुट्टी’ मिळालीच नसती मला.
हे सुरू असताना कुनीतरी व्हिडीओ काढला. आनि आज कुठनंतरी नंबर मिळवून मला व्हिडीओ पाठवला. म्हन्लं, “नंबर कुनी दिला???”.. म्हन्ले “सातार्‍यात तुमचा नंबर मिळवनं आवघड हाय व्हय? मिळवला.. सुट्टी नाय..!”

किरण माने यांनी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत राधिकाच्या भावाची देखील भूमिका साकारली होती. ‘मुलगी झाली हो’ मालिकेत ते साकारत असलेल्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांची खास पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा