Wednesday, August 6, 2025
Home साऊथ सिनेमा Assault Case: विजय बाबू विरोधात जारी केली जाऊ शकते ‘रेड कॉर्नर नोटीस’, फरार होण्याचा आहे आरोप

Assault Case: विजय बाबू विरोधात जारी केली जाऊ शकते ‘रेड कॉर्नर नोटीस’, फरार होण्याचा आहे आरोप

लैंगिक छळ प्रकरणी दक्षिण भारतीय अभिनेता विजय बाबूच्या (Vijay Babu) अडचणीत वाढ होताना दिसतेय. नुकतेच कोची पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले होते. ही नोटीस कोणत्याही पोलिस प्रकरणात फरार किंवा देश सोडून जाण्याचा संशय असलेल्या व्यक्तीसाठी जारी केली जाते. सध्या जर अभिनेता हजर झाला नाही, तर त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकते. या प्रकरणाबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विजय बाबूने पासपोर्ट अधिकाऱ्याला सांगितले की, तो २४ मे रोजी कार्यालयात हजर होईल. कोची शहर पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेत्याने तसे केले नाही, तर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाईल. मात्र, आतापर्यंत या प्रकरणी इंटरपोल (इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन) किंवा यूएई पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (sexual assault case police may issue red corner notice against vijay babu)

विजय बाबूचा पासपोर्ट आणि व्हिजा अवैध 
कोची पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे की, अभिनेता विजय बाबूचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्याच्या पासपोर्टवर दिलेले सर्व व्हिजा आता अवैध ठरले आहेत. तो दुसऱ्या देशात गेल्याचे संकेत मिळत आहेत. त्याच्याविरुद्ध आमच्याकडे न्यायालयीन वॉरंट आहे.”

हे होतं संपूर्ण प्रकरण
दाक्षिणात्य अभिनेता विजय बाबूवर एका महिलेचे लैंगिक शोषण आणि फेसबुक लाईव्हद्वारे तिची ओळख उघड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभिनेत्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पीडितेची ओळख उघड करण्यासाठी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय बाबूच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे निर्मित चित्रपटांमध्ये काम केलेल्या महिलेने २२ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर विजय बाबूने फेसबुक लाईव्हवर येऊन स्वत:ला निर्दोष घोषित केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा