×

धक्कादायक! प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल, सिनेसृष्टीत उडाली खळबळ

एकीकडे साऊथ इंडस्ट्री दिवसेंदिवस नवनवीन शिखरं गाठत आहे, तोच दुसरीकडे तिथूनच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay Babu) यांच्याशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून विजय बाबूविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना २२ एप्रिल रोजी तक्रार मिळाली होती, त्यानंतर त्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, अभिनेता विजय बाबू याने कोची येथील फ्लॅटमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोझिकोड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने सांगितले की, तिचा एकदा नव्हे, तर अनेक वेळा छळ झाला आहे. विजय बाबूने तिला चित्रपटात कामाचे आश्वासन दिले होते, परंतु त्याने ते पूर्ण केले नाही. महत्त्वाचे म्हणजे, गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांहून अधिक काळ लोटला असला, तरी पोलिसांनी अद्याप अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावलेले नाही. (vijay babu famous south actor and producer alleged of rape by a woman)

काय म्हणाला विजय बाबू?
या आरोपांदरम्यान मल्याळम सुपरस्टार विजय बाबूचे वक्तव्य समोर आले आहे. विजय बाबूने आपल्या फेसबुक लाईव्हवर सांगितले की, “मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे मी घाबरत देखील नाही. इथे मी पीडित आहे. माझ्यावर हे आरोप करणाऱ्या महिलेला मी २०१८ पासून ओळखतो.”

कोण आहे विजय बाबू?
अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेला विजय बाबू हा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तो अभिनेता तसेच निर्माता आहे. अभिनेत्याचे ‘फ्रायडे फिल्म हाऊस’ नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. त्याने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आता त्याच्यावर असे गंभीर आरोप झाल्यानंतर मल्याळम इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post