Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड भावना मेननचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टाळ्यांच्या गजरात स्वागत, लैंगिक अत्याचाराची झाली होती शिकार

भावना मेननचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात टाळ्यांच्या गजरात स्वागत, लैंगिक अत्याचाराची झाली होती शिकार

कार्तिका मेनन जिला भावना मेनन (Bhavna Menon) या नावाने ओळखले जाते. ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मुख्यतः ती दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि पूर्वी तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणामुळे ती चर्चेत होती. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अभिनेत्री भावना मेननचे मंचावर टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि इतर कलाकारांसह अभिनेत्रीने दीपप्रज्वलन केले. शनिवारी (१९ मार्च) केरळमध्ये या अभिनेत्रीचा पहिला सार्वजनिक मेळावा होता. २०१७ मध्ये कामावरून घरी परतत असताना काही लोकांनी तिचे कारमधून अपहरण केले होते. या प्रकरणाची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, आरोपींमध्ये सहकारी अभिनेते दिलीपच्या नावाचाही समावेश आहे.

“आपल्याला लढायचे आहे हा संदेश अगदी स्पष्ट आहे आणि भावनाला लपविण्यासाठी किंवा लाज वाटण्यासारखे काहीही नाही. ती एक व्यावसायिक आहे,” IFFK च्या कलात्मक संचालक बीना पॉल, वुमन इन सिनेमा कलेक्टिव्हच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. बीना पॉल म्हणाली की, “भावना ही एक सामाजिक व्यक्ती आहे आणि ती लपवणार नाही. इतर अनेक महिलांसाठी हा एक स्पष्ट संदेश आहे ज्या कोणत्याही प्रभावशाली पदावर नाहीत. जानेवारीमध्ये, अभिनेत्रीने सोशल मीडियावर जाहीर केले की, ती आपला प्रवास सुरू ठेवत आहे आणि न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

भावना म्हणाली की, “हा सोपा प्रवास नव्हता. माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ५ वर्षांपासून माझे नाव आणि माझी ओळख दफन झाली आहे. मला अपमानित करण्याचे, गप्प करण्याचे आणि वेगळे करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तरीही मला न्याय मिळेल अशी आशा आहे.”

भावना मेनन जास्त करून मल्याळम आणि काही कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करते. तिने वयाच्या १६ व्या वर्षी २००२ मध्ये ‘नम्मल’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. भावना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत ती तिच्याबद्दल अपडेट्स देत असते. सध्या ती तिच्या चमकदार लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

भावना मेनन हिचे फेब्रुवारी २०१७ मध्ये शूटिंगवरून घरी परतत असताना अपहरण करण्यात आले होते. यानंतर पुरुषांच्या टोळक्याने चालत्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एप्रिल २०१७ मध्ये मीडियामध्ये अनेक बातम्या आल्या होत्या की, अभिनेता दिलीप हा या जघन्य कृत्याचा मुख्य आरोपी होता आणि नंतर त्याला चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मिळाला, ज्यामुळे अभिनेत्रीची इमेज खूप खराब झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा