Tuesday, May 28, 2024

बेक्रिंग! कस्टम ड्युटी न दिल्याने शाहरुख खानला विमान तळावरच गाठले पोलिसांनी

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणार अभिनेता शाहरुख खान आणि त्यासोबत त्याच्या पूर्ण टीमला मुंबई विमान तळावरील कस्टम विभागाने रस्ता अडवला. ही घटना शु्क्रवारी ( दि. 11 नोव्हेंबर) दिवशी घडली. त्यावेळेस शाहरुखला एक तास पोलिसांनी चौकशी करण्यास बोलावले होते. तेव्हा त्याच्यासोबत त्याची मॅनेजर आणि बॉडीगार्ड यांना देखिल स्पॉट करण्यात आलं होतं, तेव्हा त्याच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना कस्टम  पोलिसांनी पकडले होते. 

माहिता नुसार समोर येत आहे की, लाखो रुपयाच्या किंमतीच्या घड्यांना बाहेर देशातून भारतामध्ये आणल्यामुळे अभिनेता शाहरुख खान (Sharukh khan) याला पोलिसांनी 1 तासासाठी चौकशी करण्यास नेले होते मात्र, बॅगमध्ये फक्त घड्यांचे बॉक्स निघाले त्यामुळे फक्त चौकशीसाठी शारुखला मुंबई विमान तळावर गाठले. किंग खानची मॅनेजर पुजा ददलानी हिला विमानतळावरुन आधी तिला पकडले आणि मग त्याचा बॉडिगार्ड रवि याला देखिल टीमने जाग्यावरच पकडले होते.

झाले असे की, अभिनेता आपल्या टीमसोबत खाजगी चार्टर VTR- SG दुबईवरुन एका पुस्तकाच्या प्रदर्शनासाठी तो रात्रीच्या 12 वाजता मुंबईमध्ये परतला होता. रेड चैनेल पार करत असताना कस्टम ड्युटीने त्यांच्या बॅगांची झडती गेतली तेव्हा त्याच्या बॅगमध्ये लाखो रुपयाच्या घड्याळ सापडल्यामुळे कस्टमने पूर्ण टीमलाच अडवले. शाहरुखच्या बॅगमध्ये Babun & Zurbk आणि  Rolex चे 6 डब्बे, Spirit ब्रॅंडच्या घड्याळ (कमीतकमी 8 लाख रुपए) त्यासोबतच apple सिरिजच्या घड्याळ मिळाल्या. त्यासबतच त्याचे रिकामे बॉक्सदेखिल सापडले.  कस्टम ड्युटीने जेव्हा घड्याळ्यांवार कस्ट ड्युटी लावली तोव्हा, टोटल रक्कम 17 लाख 56 हजार 500 रुपये एवढी कस्टम ड्यटीची किंमत झाली. कोट्यावदीच्या घड्याळांवर लोखोरुपयाचे टॅक्स बरावे लागलं यानंतर मॅनेजर पुजा ददलानीला सोडले  मात्र, शाहरुख आणि बाकीच्य टीमला पोलिसांनी चौकशी करण्यासठी थांबवले.

माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्याचा बॉडिगार्ड रवी याने 6 लाख 87 हजार रुपएचे कस्टम पेड केले होते, ज्याचे बिल रवीच्या नावावरच होते, पण याचे पेमेंट शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डवरुन केले होते. या घटनेची पूर्ण कारवाई कमिश्नर पुगल आणि युद्धीवर यादव यांनी केली होती.  कारवाई पुर्ण झाल्यानंतर अभिनेत्याचा बॉडीगार्ड रवीला 8 वाजता कस्टम ड्युटीने सोडले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वेस्टर्न लूकमध्ये तेजश्रीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
बेक्रिंग! कस्टम ड्युटी न दिल्याने शाहरुख खानला विमान तळावरच गाठले पोलिसांनी

हे देखील वाचा