Monday, June 24, 2024

शाहरुखने RRR ला ऑस्करसाठी दिल्या शुभेच्छा; म्हणाला, ‘कुपया मलाही…’

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाचा ट्रेलर मंगळवार (दि, 10 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकाच्या पसंतीस उतरला आहे. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याचा अभिनय आणि अ‍ॅक्शनचे अनेकांनी कौतुक केलं आहे. शाहरुखने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंडवरुन पठाण चित्रपटाचा पहिला ट्रेलर शेअर केला होता,तेव्हा बॉलिवूड आणि तेलुगू इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी शहारुखचे कौतुक केले हतो. त्यापैकी राम चरण याने देखिल शाहरुखचे कौतुक केले होते. आता त्याने राम चरणला ऑस्करसाठी शुभेच्छा दिल्या असून स्वादिष्ठ मेजवानी देण्यास सांगिलं आहे.

राम चरणने ट्वीट शेअर करत लिहिले होते की, “#पठानच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! @iamsrk सर तुम्हाला अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये पाहण्यास उत्सुक आहे, जसे यापूर्वी कधीही नव्हते! #PathaanTrailer.” यावर शाहरुखने उत्तर देत लिहिले की, ” तुमचे खूप खूप आभारी आहोत, माझा मेगा पॉवर स्टार @alwaysramcharan. जेव्हा तुमची RRR टीम ऑस्कर भारतात आणेल, तेव्हा कृपया मला स्पर्श करू द्या!!  खुप प्रेम आहे.”

एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित चित्रपटाने ऑस्करच्यादोन शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट गाण्याची श्रेणी आणि 14 इतर समाविष्ट आहेत. ऑस्करसाठीची जी नामंकाने आहेत ती (दि, 24 जानेवारी) रोजी जाहीर केले जातील. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) अभिनीत, आरआरआर यूएसमध्ये एक मेगाहिट ठरला आहे जिथे हॉलीवूडमधील प्रमुख नावांनी या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

शाहरुखचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 2018 चा ‘झिरो’ होता, जो बॉक्स ऑफिसवर अपयश आले हते. पाच वर्षांनंतर, अभिनेत्याने हिट चित्रपट देण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे. मात्र, शाहरुखसाठी हा प्रवास सुरळीत होणार नाही, कारण चित्रपटापूर्वीच त्यामधील बेशरम रंग प्रदर्शित झाल्यापसून वादात सापडलं आहे. दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हिंदु धर्मिय आणि भाजप नेत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चित्रपटातील काही सीन बादलावे म्हणून चित्रपटाला सोन्सॉर बोर्डकडे पाठवण्यात आलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॉट! मालदीवच्या समुद्रावर फुलल तुलसी कुमारचं सौंदर्य
‘तुम्ही भारताला….’, आरआरआर चित्रपटाच्या गोल्डन यशावर नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

हे देखील वाचा