Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाहरुख खानच्या लाडक्या लेकीने शेअर केला फोटो; मिरर सेल्फीतून दाखवला तिचा कमनीय आकर्षक बांधा

 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान २१ वर्षाची झाली आहे. साक्षात किंग खानची कन्या असलेली सुहाना खूप सुंदर आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सुहानाचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. तिच्या प्रत्येक पोस्ट, फोटोला चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत असतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. सुहानाने तिच्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे.

सुहानाने तिच्या अधिकृत अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये तिने ३ सेल्फी फोटोंचे कोलाज शेअर केले आहे. सुहानाने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला असून ती आरशा समोर उभी राहून सेल्फी काढताना दिसत आहे. तिने ब्लॅक कलरची पॅन्ट आणि ब्लॅक कलरचा टाॅप घातला असून, केसांचा बन बांधला आहे. तसेच तिने हातात ट्रेंडी हॅन्ड बॅग घेतली आहे. सुहानाने शेअर केलेला फोटो पाहून तो फोटो वॉशरूमध्ये काढला असल्याचे दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/suhanakhan

 

सुहानाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षण केला आहे. तिच्या या फोटोवर तिची बेस्ट फ्रेंड शनाया कपूरने कमेंट केली आहे. शनायाने कमेंट करताना लिहिले की, “तुझा हा लूक सर्वात भारी आहे.” ब्लॅक ड्रेसमध्ये सुहाना बोल्ड आणि मादक दिसत आहे. याशिवाय फोटोमध्ये तिचा कमनीय बांधा देखील लक्षवेधत आहे. सुहाना खान चित्रपटांमध्ये झळकत नसली, तरी तिच्या ग्लॅमरस अदांनी बड्या अभिनेत्रींना देखील टक्कर देत असते. अभिनेत्री नसूनही तिचा फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.

सुहाना न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंग शिकत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना तिच्या काॅलेज प्रोजेक्टसाठी केलेल्या ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शाॅट फिल्ममध्ये दिसली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा