बहुर्चित शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाने आवघ्या भारताला भारावून सोडलं आहे. वादाच्या घेऱ्यात अडकणाऱ्या पठाणने प्रदर्शानाच्या चार दिवसातच तब्ब्ल 400 कोटी रुपयांची कमाइ केली आहे. त्याशिवाय भारतामधील पुर्ण स्क्रिनिंगही पठाणनंच व्यापलं आहे. त्यामुळे बॉलिवूड इंडट्रीमध्ये आनंदाचं वादळ आल्या सारखं झालं आहे. अनेक कलाकारांनी शहरुखच्या अभिनयाचं आणि धाडसाचं कौतुक केलं आहे. भारतातच नाही तर परदेशातही पठाणने झेंडे गाडले आहेत. चित्रपटाची क्रेज पाहून राष्ट्रपती भवनातही पठाण चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं आहे.
तब्बल 4 वर्षानंतर किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यावर परतल्याने चाहत्यांमध्ये कामलिचा उत्साहा पाहायला मिळत आहे. त्याशिवाय चाहत्यांनी चित्रपाटाच्या पहिल्याच दिवशी ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या गजरात पठाणनचं स्वागत केलं आहे. चाहत्यांप्रतीचा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावून गेला आहे. एकीकडे चित्रपटाचा वाद आणि दुसरीकडे चाहत्यांची क्रेज पाहूण ट्रोलर्सला देखिल मोठा धक्का बसाल आहे.
अशातच पूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांचे सेक्रेटरी असणारे एसएम खान यांनी ट्वीटवर चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट शेअर करत लिहिले की, राष्ट्रपती भवनाच्या कल्चरल सेंटरमध्ये पठाण चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग, त्यासोबत त्यांनी शाहरुख खानलाही टॅग केले होते.
At special screening of #Pathan at Rashtrapati Bhavan cultural centre. @iamsrk @pooja_dadlani pic.twitter.com/976WYSDovw
— SM Khan (@SmkhanDg) January 28, 2023
सांगायचे झाले तर पठाण (दि, 25 जानेवारी 2022) रोजी प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुख शिवाया अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika) Padukone), आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखिल पाहायाला मिळत आहे. त्याशिवाय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी देखिल महत्वाची भूमिका निभावली आहे. पठाण चित्रपटाची कथा एका गुप्तहेरावर अवलंबून आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 57 कोटींची कामइ केल्यामुळे पठाण हिंदी चित्रपटामध्ये सगळ्यात मोठी ओपनिंग मनाली जात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नीना गुप्तांच्या मुलीने थेट वडिलांसमोरच केलं पतीला किस, व्हायरल व्हिडिओवर नेटेकऱ्यांनी व्याक्त केला संताप
रखीवर सोळलाय दु:खाचा डोंगर! काही दिवसांपूर्वीच वडीलांच निधन आणि आता आई…, वाचा राखीच्या कुटुंबियांविषयी