Friday, April 19, 2024

प्रथमच एकत्र झळकणार दीपिका पादुकोण- हृतिक रोशन; आगामी ‘फायटर’ची शूटींग झाली पूर्ण

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अजून एकत्र कोणताच चित्रपट केलेला नाही. पण त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांना एकत्र बघण्याची खूप इच्छा आहे. त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन या जोडीचा देखील समावेश होतो. या दोघांनी अजून एकही चित्रपटात एकत्र काम केले नव्हते. परंतु आता ते चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. ते म्हणजे ते दोघेही आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ते दोघेही सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात त्या दोघांची जोडी कमालीची दिसणार आहे. आता त्यांचे चाहते त्यांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शन केलेला ‘फायटर’ या चित्रपटाच्या नावावरून ही गोष्ट लक्षात येत आहे की, या चित्रपटात भरपूर ऍक्शन सीन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित करण्याचे प्लॅनिंग करत होते. परंतु आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलून हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित अंधेरे वायकॉम १८ स्टुडिओच्या प्रोड्युसरने ट्वीट करून या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, “२०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनी भारताचा पहिला एरिअल फ्रेंचाइजी ‘फायटर’साठी तयार राहा. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण बॉक्स ऑफिसवर येत आहे.” (deepika padukone and hritik roshan first time working together in film fighter)

मागच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये हृतिक रोशनने इंस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले होते की, दीपिका, सिद्धार्थ आणि तो एकत्र दिसणार आहेत. त्या तिघांचा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले होते की, “ही गँग टेकऑफसाठी तयार आहे #फायटर.”

हृतिक रोशनच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड कलाकार देखील कमेंट करून त्यांच्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत होते. अभिषेक बच्चनने देखील या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या. एका चाहत्याने कमेंट करून लिहिले होते की, “ओएमजी मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली की, “शेवटी काही फायटर कंटेंट.” अशा प्रकारे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर

-करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य

-शतक ठोकल्यानंतर सुनील शेट्टीने केली केएल राहुलची प्रशंसा; नेटकरी म्हणाले, ‘पहिल्यांदाच सासऱ्याने जावयाची…’

हे देखील वाचा