Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड तब्बल ७ वर्षांनी शाहरुख आणि काजोलची दिलवाली जोडी ‘या’ चित्रपटात झळकणार एकत्र, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

तब्बल ७ वर्षांनी शाहरुख आणि काजोलची दिलवाली जोडी ‘या’ चित्रपटात झळकणार एकत्र, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

शाहरुख खान (shahrukh khan) आणि काजोल (kajol)यांची ऑनस्क्रीन जोडी बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे, ज्याची क्रेझ प्रेक्षकांच्या हृदयातून आणि मनातून गेली नाही. दोन्ही चित्रपटांवर चाहत्यांची नजर आहे. वर्षानुवर्षे आपली मोहिनी पसरवणाऱ्या या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहून अनेक वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यान, शाहरुख-काजोलची ही ऑल टाईम फेव्हरेट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची बातमी आहे. आणि या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचे काम दुसरे कोणी नाही तर करण जोहर करणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख खान आणि काजोल करण जोहरच्या (karan johar) आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये छोट्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात या दोघांचे खास गाणे किंवा एखादा खास सीन असू शकतो. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia bhatt) आणि रणवीर सिंग (Ranvir singh) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. आता शाहरुख-काजोलचीही जोडी जोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाचे शूटिंग अजूनही सुरू आहे. या चित्रपटात काजोल आणि शाहरुख कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. दोघेही लवकरच मुंबईत त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. हा चित्रपट फेब्रुवारी २०२३ मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या शाहरुख खान आणि काजोल या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, मात्र ही बातमी खरी मानली तर हे दोन कलाकार ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघे ‘दिलवाले’ (२०१५) मध्ये शेवटचे दिसले होते.

शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. यासोबतच तो ‘3 इडियट्स’ दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये तापसी पन्नूसोबतही जोडला गेला आहे. शाहरुखने यावर्षी एप्रिलमध्ये फिल्मसिटीमध्ये तयार केलेल्या सेटवर या प्रोजेक्टचे शूटिंगही सुरू केले आहे. शाहरुखने नुकतेच तमिळ अभिनेत्री नयनतारासोबत अॅटलीच्या चित्रपटासाठी शूटिंग केले. दरम्यान, काजोल रेवती दिग्दर्शित ‘द लास्ट हुर्रा’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा