Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड ‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

मागील काही दिवसांपासून शाहरुख खान आणि आर्यन खान ही बापलेकाची जोडी कमालीची गाजत आहे. आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान झळकला आणि सगळीकडे ही जोडी गाजण्यास सुरुवात झाली. शाहरुख खान हा बॉलिवूडचा बादशाह असल्याने त्याचा मुलगा आर्यन हा देखील अभिनयात किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये करियर करेल असे म्हटले जात होते. मात्र आर्यनला व्यवसायात जास्त रस आहे. नुकताच त्याने त्याचा क्लोथिंग ब्रँड लाँच केला आहे. आयपीएल लिलावानंतर आता आर्यनने कपड्यांच्या व्यवसायात उडी घेतली आहे.

लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड डियावोल एक्स (D’YAVOL X) लॉन्च केला. चाहत्यांना काही लिमिटेड एडिशन कपडे मिळावेत म्हणून आर्यनने त्याच्या ब्रँडचे ऑनलाइन शॉप उघडले. मात्र आता या कपड्यांपेक्षा जास्त तर त्याच्या किंमतींमुळे हा ब्रँड चर्चेत आला आहे. सोबतच ट्रोलर्स देखील या ब्रँडमुळे शाहरुख आणि आर्यनला ट्रोलिंगची संधी मिळाली आहे. आर्यनच्या या नवीन ब्रँडमध्ये डियावोल एक्स मधील एका जॅकेटची किंमत 1 लाख असून, एका टीशर्टची किंमत 24000 आहे. एवढे महाग कपडे असूनही आर्यनचे कलेक्शन एका दिवसात विकले गेले.

या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे आता लोकांनी ट्विटरवर आर्यनला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. कपड्यांच्या किमतीत झालेली एवढी वाढ पाहून लोकांनी ट्वीट केले की, ‘फक्त आर्यन आणि शाहरुखचा ब्रँड आहे, याचा अर्थ टी-शर्टची किंमत २४ हजारांपासून सुरू व्हावी, असे नाही.’

एकाने लिहिले आहे की, “५० हजार किंमतीचे शर्ट आहे, यात मी आणि माझे संपूर्ण घर जाईन.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे विकत घेण्यासाठी नुकतेच मी माझे घर विकले. यानंतर किडनी विकणार, तुमचा मोठा चाहता आहे.” अजून एकाने लिहिले की, “तुमच्या हुडीची किंमत माझ्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.” एकाने विचारले आहे की “भावा, ईएमआयचा पर्याय आहे का?”

दरम्यान आर्यनचा संपूर्ण स्टॉक संपल्यामुळे शाहरुख खानला आनंद झाला असून, त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले, “या प्रवासासाठी धन्यवाद. आमचे सर्व सामान विकल्या गेले आहे. पुढच्या कलेक्शनपर्यंत सोबत राहा.” शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच दिग्दर्शनाच्या जगात पदार्पण करणार आहे. दरम्यान आर्यनने याआधी बिझनेस जगतात पहिले पाऊल टाकले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा