Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड किंग खानला पुन्हा इजा, उपचारासाठी होणार अमेरिकेला रवाना !

किंग खानला पुन्हा इजा, उपचारासाठी होणार अमेरिकेला रवाना !

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. शाहरुखला परदेशी चाहत्यांचेही खूप प्रेम मिळते. शाहरुख आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे, पण यावेळी त्याचे कारण एखादा चित्रपट नसून त्याची तब्येत आहे. वृत्तानुसार, शाहरुख डोळ्याच्या समस्येने त्रस्त आहे आणि त्याच्या उपचारासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आज म्हणजेच ३० जुलै रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. शाहरुख खान डोळ्यांच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात गेला होता. त्याचा उपचार त्याच्या योजनेनुसार झाला नाही आणि शाहरुख उपचाराने देखील खूश नव्हता. त्यामुळे शाहरुखला आता उपचारासाठी अमेरिकेला नेण्यात आले आहे.

याच वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खानला त्याचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएल सामन्यादरम्यान उष्माघातामुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.डिहायड्रेशनमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले गेले होते. त्यावेळी शाहरुखची जवळची मैत्रीण अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता केडी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले.

शाहरुखची २०१४ मध्ये डोळ्याची छोटी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर, त्याने त्याच्या एक्स हँडलवर एक नोट शेअर करून डॉक्टरांचे आभार मानले होते. शाहरुखने लिहिले होते कि, “माझी शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ बुर्जोर बनाजी आणि त्यांच्या प्रिय पत्नीचे खूप आभार. आता सगळं चांगलं आहे, आता मी नीट वाचू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमानची पहिली प्रेमकथा; १९ व्या वर्षी झालं पाहिलं प्रेम !
आर्यन खानने खरेदी केली वडिलांची प्रॉपर्टी … ३७ कोटी रुपयांना खरेदी केले २ मजले

हे देखील वाचा