कोरोनाचा काळ कोणासाठीही सोपा नव्हता. मग तो सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. काही काळापासून प्रत्येकाला कठीण या दिवसांचा सामना करावा लागत आहे. या कठीण काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांनाही गमावले आहे. अलीकडेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) याने त्याचे वडील गमावले आहेत. अभिनेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. २० जानेवारी २०२२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडील गमावल्यानंतर शाहीर शेख तुटला आहे. तो आता खूप दुःखी आहे आणि त्याला त्याच्या वडिलांची खूप आठवण येत आहे. यासाठी अभिनेत्याने वडिलांच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहीर शेखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर वडिलांचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह त्याने वडिलांना गमावणे ही त्याच्यासाठी सर्वात दुःखाची वेळ असल्याचे सांगितले आहे. (shaheer sheikh shares his late father photos and wrote emotional note for)
शाहीर शेखने लिहिले, “संयम, दया आणि नम्रता यात महानता आहे. इतरांना देण्यात आनंद आहे आणि प्रामाणिकपणामध्ये शांतता आहे. या जगातील सर्वात अविश्वसनीय माणसासाठी जर कोणी मार्गदर्शक असेल तर ते माझे वडील होते. त्यांना गमावणे, त्याला जाताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षण होता. त्यांनी माझ्या हृदयात आणि आयुष्यात एक पोकळी निर्माण केली आहे.”
आपल्या वडिलांना आठवत शाहीर शेख पुढे म्हणाला, “पण त्याआधी त्यांनी माझे जीवन अर्थ आणि उद्देशाने भरले आहे. त्यांनी माझे जीवन इतके प्रेम आणि करुणेने भरले आहे की आता त्याच्यामध्ये द्वेषाला जागा नाही. त्यांचे अद्भुत जीवन पाहून आणि लहान असो की मोठ्या प्रत्येकाला त्यांनी दिलेले प्रेम पाहून, प्रत्येकासाठी त्यांचा आदर पाहून मी धन्य झालो.”
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, शाहीर शेख लवकरच ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये दिसणार आहे. या मालिकेत अभिनेत्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) दिसणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म ‘Zee5’ वर प्रसारित होईल, ज्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
हेही वाचा :
- Happy Birthday: अभिनेता म्हणून केली करिअरची सुरुवात, पण दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंनी दिले सुपरडूपर हिट चित्रपट
- फाल्गुनी पाठकच्या गाण्याने मिळाली ओळख, पण एमएमएस लीक झाल्यावर चांगलीच वादात सापडली होती रिया सेन
- जेव्हा रूममध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पडकली गेली होती प्रियांका चोप्रा, लालबुंद झालेल्या मावशीने केलं ‘हे’ काम