बॉलिवूडमधील रोमॅंटिक, चॉकलेट बॉय हिरो म्हणून शाहिद कपूरला ओळखले जाते. त्याने त्याच्या अभिनयाने आणि गुडलुक्सने नेहमीच लोकांना आकर्षित केले आहे. यावर्षी शाहिदने ‘फर्जी’मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. त्याची ही सिरीज लोकांना चांगलीच आवडत आहे. या सिरींजीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, सेरीजने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाहिली गेलेली सिरीज म्हणून आता या सिरीजचे नाव घेतले जाईल. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच सिरीज अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली होती. यात शाहिदने एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
ओरमक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार फर्जी भारतात सर्वात जास्त पाहिली गेलेली ओरिजिनल एसवीओडी (सब्सक्रिप्शन व्हिडिओ ऑन डिमांड) सेरीजच्या लिस्टमध्ये टॉपवर पोहचली आहे. या सिरीजने अजय देवगनच्या ‘रुद्र’ (35.2 मिलियन दर्शक), पंकज त्रिपाठी यांच्या ‘मिर्जापुर सीजन 2’ (32.5 मिलियन दर्शक), जीतेंद्र कुमार यांच्या ‘पंचायत 2’ (29.6 मिलियन दर्शक), पंकज त्रिपाठी यांच्या ‘क्रमिनल जस्टिस’ (29.1 मिलियन दर्शक) आणि नुकतीच आदित्य रॉय कपूरची मुख्य भूमिका असलेली ‘द नाइट मैनेजर’ (27.2 मिलियन दर्शक) आदी सिरिजला मागे टाकले आहे.
‘फर्जी’ला आतापर्यंत देशात ३७ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिले असल्याचे सांगितले जात आहे. या सिरीजमध्ये शाहिद कपूरसोबतच विजय सेतुपति, राशी खन्ना, के के मेनन, रेजिना कैसेंड्रा, ज़ाकिर हुसैन, भुवन अरोड़ा, अमोल पालेकर आणि कुब्रा सैत आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल
राघव चड्ढा यांनी परिणीतीसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर तोडले मौन; ब्लश हाेत म्हणाले…