Thursday, April 25, 2024

‘शेवटच्या क्षणापर्यंत राजासारखे जगले’, प्रकाश मेहरांनी दिला राजेश खन्ना यांच्या स्मृतींना उजाळा

राजेश खन्ना बस नाम ही काफी है! एका पाठोपाठ एक १५ सिनेमे सुपरहिट देणाऱ्या राजेश खन्ना यांच्या लोकप्रियतेचा आणि प्रसिद्धीचा दबदबा सर्वांनीच पाहिला आहे. आजच्या पिढीला देखील त्यांचे अनेक किस्से ऐकून ते किती महाग अभिनेते होते हे माहित झालेच असेल. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्ना यांच्या बाबतीत अनेक किस्से आणि गोष्टी आपण ऐकल्या, वाचल्या असतील. मात्र राजेश खन्ना यांचे मित्र असलेल्या प्रकाश मेहरा यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सिनेसृष्टीमधे असे अनेक मोठे दिग्गज कलाकार आहेत, जे आजच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये जवळपास सर्वच सुपरस्टार आहे. मात्र, या सर्वात मोठ्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे सर्वात पहिले सुपरस्टार हा किताब मिळवणारे अभिनेते म्हणजे राजेश खन्ना. एकापाठोपाठ एक १५ सुपरहिट सिनेमे देणारे काका उर्फ राजेश खन्ना यांनी जे स्टारडम अनुभवले आणि जी प्रसिद्धी मिळवली, ती आजतागायत कोणालाच मिळवता आली नाही.

प्रकाश मेहरा हे एका म्युझिक कंपनीचे मालक तर आहेतच, सोबतच ते राजेश खन्ना यांचे मित्र आणि बिझनेस पार्टनरसुद्धा होते. प्रकाश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “राजेश खन्ना हे अतिशय मस्त मौला स्वभावाचे व्यक्ती होते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी राजासारखे जीवन जगले. त्यांच्यासारखा उदार माणूस मी माझ्या संपूर्ण जीवनात नाही पहिला. मीडियामध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल जी छबी होती, ती साफ खोटी होती. मी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा एक पुरावा आहे.”

rajesh khanna
Photo Courtesy: Instagram/rajeshkhanna_first_superstar

पुढे प्रकाश म्हणाले, “राजेश खन्ना नेहमी म्हणायचे आम्ही खत्री आहोत. खत्री मुलींकडून काही घेत नाही, तर मुलींना भरभरून देतात. डिंपल या शेवटच्या श्वासापर्यंत राजेश खन्ना यांच्या सेवेत होत्या. चोवीस तास त्या काकांची काळजी घेत होत्या. ते आजारी पडल्यानंतर त्यांची बॉण्डिंग दिसली. अक्षय कुमार तर त्यांना मित्रासारखा होता.”

काका आणि डिंपल यांचा एक किस्सा सांगताना प्रकाश म्हणाले, “एकदा डिंपल आणि काका एका रेडिओ स्टेशनला मुलाखतीसाठी गेले होते, तेव्हा डिंपल यांना एका श्रोत्याने त्यांच्या सौंदर्याचे गुपित विचारले, तेव्हा राजेश खन्ना यांनी माईक स्वतःकडे घेतला आणि म्हणाले, ‘मी आहे.’ एकदा ट्रीपला जाण्यासाठी डिंपल यांनी काकांसाठी शॉपिंग केली. त्यात त्यांनी काकांसाठी त्यांची आवडती सिगारेट आणि गॉगल आणले. मात्र, काका ते घालण्यासाठी तयारच नव्हते. डिंपल यांनी खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी ते घातले आणि विचारले, ‘दिसतोय ना राजेश खन्ना यांच्यासारखा?’ काकांनी त्यांच्या डॉक्टरांना ‘आनंद’ चित्रपटाची डीव्हीडी भेट म्हणून दिली होती. त्यांना त्यांचे आयुष्य आनंद सिनेमासारखेच वाटायचे.”

काकांच्या मित्रांबद्दल प्रकाश म्हणाले, “त्यांना त्यांच्या मित्रांनी खूप निराश केले होते. ज्या लोकांसाठी मित्रांसाठी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला काका उभे राहिले, तेच नंतर त्यांना पुरेनासे झाले. काका नेहमी म्हणायचे, या क्षेत्रात नाती शुक्रवार ते शुक्रवार बदलतात. एकदा त्यांनी जीवनगौरव पुरस्कार अमिताभ यांच्याकडून स्वीकारल्यानंतर मीडियाने त्यांना विचारले की तुम्ही सोबत काम करणार का? त्यावर ते म्हणाले की, का नाही? मात्र, निर्माता पाहिजे.” काकांचे असे अनेक किस्से आणि गोष्टी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. राजेश खन्ना यांनी नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच १८ जुलै, २०१२ या जगाचा निरोप घेतला. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते कायम चाहत्यांच्या मनात असतील.

हेही वाचा :

रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले झाले ‘तिकीट टू फिनाले’मधून बाहेर, घरातील सदस्यांनी दिला निर्णय

‘राजनीती’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखा बिष्टने बंगाली चित्रपटसृष्टी देखील कमावले आहे नाव, जाणून घ्या माहिती

शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू

हे देखील वाचा