शाहिद करिनापासून ते सलमान- ऐश्वर्यापर्यंत ‘या’ पाच जोड्यांच्या ब्रेकअपने चाहते झाले चकित


बॉलिवूडमध्ये बर्‍याच प्रेमकथा पडद्यावर दाखविल्या जातात, मात्र प्रेक्षकांना पडद्यामागील प्रेमकथा जास्त आवडतात. मनोरंजन जगात बर्‍याचदा एकत्र काम करणारे कलाकार एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेक्षक त्यांच्या प्रेमकथेचे साक्षीदार बनतात. प्रेक्षकांनी अशा बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा पाहिल्या आहेत. ही जोडपी पाहून चाहत्यांना वाटायचे की लवकरच त्यांच्या लग्नाची बातमी मिळेल, पण असे न होता ती जोडपी विभक्त झाली. असे काही स्टार्स आहेत ज्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का दिला. तर चला आज पाहूया अशा तार्‍यांविषयी, ज्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

रणबीर कपूर- दीपिका पादुकोण
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा रणबीर आणि दीपिकाच्या प्रेमाच्या कहाण्या चर्चेत असायच्या. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केले आहे. चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच नव्हे तर ऑफस्क्रीन जोडीही खूप आवडली. अशा परिस्थितीत जेव्हा दीपिका आणि रणबीरच्या ब्रेकअपची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला.

सलमान खान- ऐश्वर्या राय
सलमान खान एक असा बॉलिवूड स्टार आहे, ज्याच्या प्रेमकथा नेहमीच चर्चेत असतात. एक काळ असा होता, जेव्हा माजी विश्व सौंदर्यवती ऐश्वर्या रायसाठी सलमानचे हृदय धडधडत असायचे. ऐश आणि सलमानच्या प्रेमकथेने बर्‍याचदा अनेक बातम्यांच्या हेडलाईन केल्या होत्या. सलमान आणि ऐश लग्न करतील असेही चाहत्यांना वाटत होते. तथापि, हे घडले नाही. ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर हिंसाचार केल्याचा आरोपही केला होता. शेवटी बर्‍याच वादानंतर त्यांचे नाते संपले. तेव्हा या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या ऐकून सर्वांना धक्का बसला होता.

जॉन अब्राहम- बिपाशा बासू
आज जॉन प्रिया रांचल हिचा पती आहे; तर बिपाशाही करण सिंह ग्रोव्हरची पत्नी बनली आहे. तथापि, एक काळ असा होता, जेव्हा जॉन बिपाशा बॉलीवूडच्या हॉट कपल्सपैकी एक मानले जात होते. जॉन आणि बिपाशा उघडपणे एकमेकांचे हात पकडताना दिसायचे. परंतु, काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपने चाहत्यांना खूप आश्चर्यचकित केले होते.

शाहिद कपूर- करीना कपूर
शाहिद आणि करीना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जायचे. दोघांनीही प्रेक्षकांसमोर आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले होते. शाहिद आणि करीनाची जोडीही चित्रपटांमध्ये चांगलीच पसंत केली जायची. करीना कपूर तर अनेकदा शाहिदवर प्रेम व्यक्त करताना दिसली होती. मात्र, यानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी अचानक समोर आली. शाहिद करीना विभक्त झाल्यामुळे चाहत्यांना खूप वाईट वाटले होते.

नेस वाडिया-प्रीती झिंटा
जीन-गुडइनफ यांची श्रीमती बनलेल्या प्रीती झिंटाचे नाव एकेकाळी नेस वाडियाबरोबर जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्यांमुळे माध्यमांत येत होत्या. एवढेच नव्हे तर दोघेही आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालकही होते. चाहत्यांना वाटले की प्रीती आणि नेस लवकरच लग्न करतील, पण त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अचानक समोर आल्या. या जोडीचा ब्रेकअप पाहून चाहते खूप दुःखी झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.