Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड खूपच गोड! शाहिद कपूरच्या पत्नीने केला मुलगा झैनचा गोंडस फोटो शेअर; म्हणाली, ‘खूपच वेगाने…’

खूपच गोड! शाहिद कपूरच्या पत्नीने केला मुलगा झैनचा गोंडस फोटो शेअर; म्हणाली, ‘खूपच वेगाने…’

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांच्या पत्नी या आपले वैयक्तिक आयुष्य उघडपणे व्यक्त करत नाहीत. मात्र, दुसरीकडे काही अभिनेत्यांच्या पत्नी सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतात. ते आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी नेहमीच शेअर करत असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर होय. मीराने जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरीही ती सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकत्याच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती चर्चेत आहे.

मीराने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर मुलगा झैनचा गोंडस फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा मुलगा झोपलेला दिसतोय. सोबतच ती मुलाच्या वाढीमुळे चकित झाली आहे. फोटोत त्याचा चेहरा दिसत नाही. मात्र, तो रात्रीचे कपडे घालून झोपलेला दिसत आहे. फोटोत मीराचा हातही दिसत आहे. (Shahid Kapoor Wife Mira Rajput Kapoor Shared Picture of Son Zain Says Growing Up Very Fast)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले की, “खूपच वेगाने मोठा होत आहे.” तिने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना भलताच आवडला आहे. सोबतच कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

Photo Courtesy Instagrammirakapoor

याव्यतिरिक्त मीराने आपल्या इंस्टा स्टोरीवर आपल्या योगा क्लासशी निगडीत व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या चाहत्यांना योगाने होणाऱ्या फायद्याबाबत सांगत आहे. सोबतच तिने फोटो शेअर करत चाहत्यांना योगाच्या लक्ष्याबाबत विचारले आहे.

नुकतेच तिने आपल्या लग्नाचे ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. या खास क्षणी तिने पती शाहिद कपूरसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यात ती त्याला मिठी मारताना दिसत आहे. या फोटोत मीराने काळ्या रंगाचा टॉप, तर दुसरीकडे शाहिदने राखाडी रंगाचा टी- शर्ट परिधान केला आहे.

शाहिदच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटपटूच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा