Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पत्नी मीराच्या वाढदिवसानिमित्त शाहिदने खास अंदाजात केलं विश; सांगितली त्याच्या मनातली गोष्ट

कलाकार त्यांच्या अभिनयाने चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा असतो. अशात अनेक कलाकारांच्या पत्नी या गृहिणी आहेत. त्यांना आपल्या पतीच्या प्रतिष्ठेमुळेच काही लोक ओळखतात. अशातच काही गृहिणी या स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करतात. यातीलच एक आहे शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत. मीराचा जन्म ७ सप्टेंबर १९९४मध्ये झाला. मंगळवारी तिने आपल्या सत्ताविसाव्या वयात पदार्पण केले. तिच्या वाढदिवसानिमित्त शाहीदने तिला इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. त्याची शुभेच्छांची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

शाहीदने त्या दोघांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फक्त एकमेकांच्या मिठीत हसण्यासाठी नाही, तर एकमेकांच्या मिठीत रडण्यासाठी सुद्धा तू माझ्यासोबत आहेस. तू माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहेस आणि मला हा सहवास कोणा दुसऱ्याकडून नको आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” अभिनेत्याने आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Actor Shahid Kapoor wish housewife Mira Rajput on birthday with social media post)

त्याची पत्नी जरी अभिनय क्षेत्रात नाव कमवत नसली, तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मीरा तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूकचे फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे तिचा चाहता वर्ग बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीयो. तिने २मिलियन पेक्षाही अधिक चाहता वर्ग कमवला आहे. वेगवेगळ्या लूकमुळे आणि तिच्या हटके अदांनी ती कायमच चाहत्यांची मने जिंकत असते.

या आधी मीराने देखील आपल्या पतीसोबत एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. यामध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचं दिसत आहे. तसेच शाहीदने हा फोटो क्लिक केला आहे. मीरा हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “पतीच्या कौतुकाची पोस्ट. सर्वोत्कृष्ट फोटो क्लिक.”

२०१५ अडकले लग्नबंधनात

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर या दोघांनी साल २०१५मध्ये विवाह केला. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. मीशा आणि जैन अशी यांच्या मुलांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा चित्रपटांमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा सुरु होती. परंतु तिने यावर सांगितले की, “मला यामध्ये फार रस नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे.” बॉलिवूडमधील अनुष्का आणि विराटच्या जोडीप्रमाणे या जोडप्याचे देखील अनेक चाहते आहेत. या दोघांचे एकत्र फोटो पाहणे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा