Saturday, June 29, 2024

बऱ्याच दिवसानंतर सोशल मीडियावर परतला शाहरुख खान; चाहते म्हणाले, ‘किंग इज बॅक!’

-Sharad Bodage

गेली अनेक दिवस अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हता. अशातच अनेक महिन्यांनंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. एका जाहिरातीच्या व्हिडिओद्वारे त्याने इंस्टाग्रामवर पुनरागमन केले. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणी मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक झाल्यानंतर, शाहरुखने सोशल मीडियापासून अंतर ठेवले होते. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तो परतला आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी खानही (Gauri Khan) दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत शाहरुख खानने लिहिले की, “कला आणि तंत्रज्ञानाचा इतका मिलाफ असलेले उत्पादन तुम्हाला फार क्वचितच पाहायला मिळते… अत्यंत अचूकतेने चालवलेले चमकदार डिझाइन प्रत्येकाला वाहवा बनवते.” हा जाहिरातीचा व्हिडिओ असला, तरी शाहरुखचे चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्या पुनरागमनामुळे ते खूप आनंदी झाले आहेत.

आपला आनंद व्यक्त करत, एका चाहत्याने लिहिले की, “वेलकम बॅक किंग!” त्याचवेळी दुसर्‍याने लिहिले की, “मला खूप आनंद झाला की, किंग परत आला आहे.” एका चाहत्याने लिहिले की, “एवढ्या दिवसांनी शाहरुखची पोस्ट पाहून खूप आनंद झाला… शाहरुखवर नेहमीच प्रेम करा.” एकाने विचारले की, “शाहरुख सर तुमचा चित्रपट कधी येणार आहे..”

आर्यन खानच्या प्रकरणानंतर, शाहरुख खान आणि गौरी खान सोशल मीडियापासून दुरावले होते. त्यांची मुलगी सुहानाने (Suhana Khan) सुद्धा स्वतःला काही काळ सोशल मीडियापासून दूर ठेवले होते. मात्र नंतर सुहाना पूर्वीप्रमाणेच सक्रिय झाली. मात्र शाहरुखनेही हे अंतर दूर केले आहे. पुन्हा एकदा तो त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा