Saturday, July 6, 2024

सर्वोत्कृष्ट अभिनेता झाल्यावर भावुक झाला किंग खान; म्हणाला, ‘मला वाटले हा पुरस्कार कधीच मिळणार नाही’

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) नुकतेच ‘पठाण’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावल्याबद्दल किंग खानने आनंद व्यक्त केला. हा सन्मान मिळाल्यानंतर शाहरुख म्हणाला की, मला वाटत होते की हा सन्मान मला कधीच मिळणार नाही. शाहरुखने स्टेजवरूनच जवानाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. उल्लेखनीय आहे की, ‘जवान’ गेल्या वर्षी 7 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

समारंभात सन्मान स्वीकारल्यानंतर शाहरुखने मंचावरून ज्युरींचे आभार मानले. तो म्हणाला की, “मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडल्याबद्दल संपूर्ण ज्युरींचे खूप खूप आभार.” शाहरुख म्हणाला की, “मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून बरीच वर्षे उलटून गेली आहेत. हा सन्मान पुन्हा कधीच मिळणार नाही असे मला वाटू लागले होते पण आता हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे. तो पुढे म्हणाला की मला पुरस्कार आवडतात. मी थोडा लोभी आहे.”

शाहरुख पुढे म्हणाला की, “मला खूप आनंद वाटतो की लोक अजूनही माझ्या कामाला ओळखत आहेत. चित्रपटात केवळ कलाकाराचे काम महत्त्वाचे नसते. अनेक लोकांच्या मेहनतीने चित्रपट बनतो. एक कलाकार त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकून कलाकार बनतो. त्यामुळे मला हा पुरस्कार मिळवून देण्यात अनेकांचे योगदान आहे. मी वचन देतो की मी कठोर परिश्रम करत राहीन. मी भारतात आणि परदेशातील लोकांचे मनोरंजन करत राहीन, मग मला नाचायचे असेल, पडावे, उडावे, रोमान्स करावा, वाईट माणूस असेल, चांगला माणूस असेल, इंशाअल्लाह मी कठोर परिश्रम करेन.”

त्याचबरोबर जवानमध्ये शाहरुखसोबत दिसलेली अभिनेत्री नयनतारा हिला तिच्या कौशल्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सुपरस्टार शाहरुख खानने नयनताराला हा पुरस्कार प्रदान केला. 2023 चा सुपरहिट चित्रपट Animal चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना या समारंभात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब देण्यात आला आहे. याशिवाय 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर आलेल्या सॅम बहादूर या चित्रपटात माजी लष्करप्रमुखाच्या भूमिकेसाठी विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

विद्या बालनच्या नावाने बनवले बनावट सोशल मीडिया अकाउंट, अभिनेत्रीने ठगांवर केला गुन्हा दाखल
आलिया भट्ट राहाला रोज लिहिते मेल; म्हणाली, ‘ती एक स्वतंत्र आणि दयाळू व्यक्ती व्हावी’

 

 

हे देखील वाचा