जेव्हा आपल्याच चित्रपटातील ‘हे’ गाणे ऐकून स्टेजवरच रडला होता शाहरुख खान; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी स्वबळावर हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले आहे. मात्र, यासर्वांमध्ये बॉलिवूडच्या किंग खानने वेगळेच स्थान मिळवले आहे. शाहरुख खानने देखील स्वबळावरच या मायानगरीत मेहनतीने ही ओळख मिळवली. ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केलेल्या शाहरुखने त्याच्या प्रतिभेच्या जोरावर ‘बॉलिवूडचा बादशहा’ ही ओळख मिळवली.

आज बॉलिवूडमध्ये शाहरुखला ३० वर्षे पूर्ण झाले आहेत. आजच्याच दिवशी १९९२ साली शाहरुखचा ‘दीवाना’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. ऋषी कपूर, दिव्या भारती यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात शाहरुखने सहाय्यक भूमिका निभावली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि त्याच्या चित्रपटातील अभिनयाची गाडी सुरू झाली. ती आजतागायत अविरत चालू आहे. या ३० वर्षाच्या प्रवासात शाहरुखने अनेक चांगले वाईट असे दिवस पाहिले. मात्र, तो नेहमीच जमिनीशी जोडलेला आहे. कदाचित त्याच्या याच गोष्टीमुळे तो आज यशाच्या शिखरावर आहे.

शाहरुखच्या इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षाच्या प्रवासाला आठवताना सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सने अनेक संदेश आणि काही व्हिडिओ क्लिप्स पोस्ट केल्या आहेत. शाहरुखने अनेक सिनेमे केले. यातील काही चित्रपटांनी तर प्रेक्षकांना भुरळच घातली. असाच एक सिनेमा म्हणजे आशुतोष गोवारीकर यांचा ‘स्वदेश.’ या सिनेमातील त्याची भूमिका आणि त्याचा अभिनय हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो. याच सिनेमातील ‘ये जो देश हैं मेरा’ या गाण्याची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात शाहरुख स्टेजवर बसलेला असून या गाण्याची धून वाजत आहे. ही धून ऐकून शाहरुखचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या अनेक वेगवेगळ्या कधीही न पाहिलेल्या अशा क्लिप्स सोशल मीडियावर फॅन्सकडून शेअर केल्या जात आहेत.

शाहरुखने त्याच्या या ३० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, “मला तुमचे प्रेम ३० वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे हे प्रेम अबाधित आहे. माझ्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची मला खूप गरज आहे.”

शाहरुख लवकरच त्याच्या आगामी ‘पठाण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.