‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’


कलाकार आणि कलाकारांच्या संबंधित अनेक बातम्या मीडियामध्ये येतच असतात. फॅन्स आणि प्रेक्षकांनाही कलाकारांच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती जाणून घ्यायचीच असते. मात्र, आता कलाकारांइतकेच महत्त्व कलाकारांच्या मुलांना आले आहे. स्टार किड्स म्हणून ओळखले जाणारे हे किड्स जबरदस्त लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावरही हे स्टार किड्स नेहमी चर्चेत असतात.

या स्टार्स किड्समध्ये किंग खानची लेक सर्वात आघाडीवर आहे. बॉलिवूड किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत फॅन्स आणि मीडियाचे लक्ष स्वतः कडे आकर्षित करतच असते. सुहानाला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच सुहानाचे लाखो चाहते आहेत.

Photo Courtesy: Instagram/suhanakhan2

सुहानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला तिचा जिममधील एक फोटो पोस्ट केला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. हा मिरर सेल्फी असून यात सुहाना तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. सोशल मीडियावर तिच्या या ऍब्ज अन् बॉडीची चर्चा रंगलीय. फोटो शेअर करताच काही तासातंच सुहानाचा फोटो व्हायरल होवू लागला आहे. तिच्या या फोटोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

सुहाना नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असते. नुकत्याच साजरा झालेल्या ‘पितृदिना’च्या निमित्ताने सुहानाने तिच्या वडिलांसाठी शाहरुख खानसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिचा बालपणीचा फोटो पोस्ट केला होता.

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच सुहानाच्या बोल्ड फोटोची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. सुहाना लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहे. मात्र, ती नक्की कधी पदार्पण करणार याबद्दल अजून कोणतीच माहिती नाहीये. तिचे फॅन्स तिला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सारी नॉट सॉरी’, म्हणत प्रिया बापटने दाखवल्या साडीतील ग्लॅमरस अदा; एक नजर टाकाच

-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा

-क्या बात है! ८५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पाण्यात केले एरोबिक्स, तरुणाईलाही लाजवेल त्यांचा ‘हा’ उत्साह


Leave A Reply

Your email address will not be published.