Sunday, May 19, 2024

ईशा अंबानीच्या पार्टीतील शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी नवीन लूकवर केला प्रेमाचा वर्षाव

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची जुळी मुले कृष्णा आणि आदिया 18 नोव्हेंबरला एक वर्षाची झाली. अंबानी आणि पिरामल या दोघांच्याही कुटुंबांसाठी हा दिवस खूप खास होता. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी ईशा अंबानीने आपल्या मुलांसाठी जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये ग्रँड बर्थडे पार्टी आयोजित केली होती. यावेळी ईशा तिचे वडील मुकेश अंबानी यांच्यासोबत पोहोचली. या पार्टीत शाहरुख खानसह (shahrukh khan) ईशा अंबानीच्या पार्टीतील शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांनी नवीन लूकवर केला प्रेमाचा वर्षाव अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. आता पार्टीतील शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

शाहरुख खान पार्टीत पोहोचताना दिसला, पण त्याने पापाराझींना पोज दिली नाही. मात्र, या अभिनेत्याचा पार्टीमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लांब केसांसह काळ्या ड्रेसमध्ये शाहरुख खूपच सुंदर दिसत आहे. तो त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गप्पा मारताना दिसतो. अभिनेत्याच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आणि ही क्लिप पाहिल्यानंतर नेटिझन्स अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव करायला विसरले नाहीत.

व्हिडिओवर कमेंट करून चाहते शाहरुख खानच्या लूकचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करून लिहिले, ‘उफ्फ…किंगची लांब हेअरस्टाईल.’ यासोबतच अनेक यूजर्स शाहरुख खानला नेहमीप्रमाणे त्यांचा आवडता हिरो म्हणून संबोधत आहेत. त्याला अबरामबद्दल प्रश्न विचारणारे अनेकजण आहेत.

कतरिना कैफ, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी, करण जोहर यांसारखे अनेक सेलिब्रिटी ईशा अंबानीच्या पार्टीत सहभागी झाले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखने यावर्षी ‘जवान’ आणि ‘पठाण’ सारखे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली. सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ मध्ये तो ‘पठाण’च्या भूमिकेतही दिसला होता. यासोबतच तो लवकरच राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गोरखा रेजिमेंटच्या जवानांसोबत खुकरी नाचताना दिसला विकी कौशल, शेअर केला अप्रतिम व्हिडिओ
इतक्या वर्षांनी सुष्मिता सेनने सांगितले लग्न न करण्यामागील मोठे कारण, वाचा सविस्तर

हे देखील वाचा