नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मेस चालवायचे शाहरुखचे वडील, तुम्हाला माहीत नसतील त्यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी

सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस, बहुतेक कुटुंबातील मुलांचे आदर्श त्यांचे पालक असतात. सहसा मुलं त्यांच्या वडिलांकडून प्रेरित असतात. असाच एक सुपरस्टार आहे, जो आपल्या वडिलांना आपला हिरो मानतो. त्याला त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांनी दिलेली शिकवण आजही आठवते. मग ते वैयक्तिक आयुष्य असो वा व्यावसायिक आयुष्य. मायापुरी मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, शाहरुख खानशी (Shahrukh Khan) संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

वडील होते आर्दश
शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद खान हे खान अब्दुल गफ्फार खान यांच्या प्रेरणेने खुदाई खिदमतगार चळवळीत सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. ज्यांना फ्रंटियर गांधी म्हणूनही ओळखले जाते. शेवटी त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मेस चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांचा मुलगा शाहरुखचे भविष्य ठरला. या ड्रामा स्कूलमध्ये ते अनेकदा शाहरुखला सोबत घेऊन जात असत. इथूनच शाहरुखला नाटक आणि अभिनयाचा विचार आला. (shahrukh khan first teacher king khan first ever guru is his father)

सूरज का सातवां घोडा
जेव्हा शाहरुखने ‘सूरज का सातवां घोडा’ सारखे अप्रतिम नाटक पाहिले. या दरम्यान त्याला राज बब्बर, सुरेखा सिक्री, अजित वाचानी, रोहिणी हट्टंगडी आणि इतर दिग्गज कलाकार भेटले. ज्यांच्याकडून शाहरुखला अभिनय म्हणजे काय आणि अभिनय कसा शिकायचा हे कळले. त्याने मनाशी ठरवले होते, की आपल्याला अभिनय करायचाच आहे. पण हा निर्णय सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. जेव्हा त्याच्या वडिलांनी स्वत: शाहरुखला विचारले की, त्याला आयुष्यात काय करायचे आहे, तेव्हा तो काहीच बोलला नाही. मात्र त्याच्या वडिलांना खात्री होती की, त्याला अभिनेता व्हायचे आहे.

शाहरुखचे गुरु
बॅरी जॉन, सईद मिर्झा, अख्तर मिर्झा, कर्नल राज भारती आणि लेख टंडन या गुरुंनी शाहरुखला अभिनय शिकण्यास मदत केली. याशिवाय त्याने टीव्ही मालिकांमध्येही काम केले. यानंतर हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’ या चित्रपटातून शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये लीड हिरो म्हणून लॉन्च करण्यात आले. आई-वडिलांच्या निधनानंतर खिशात फक्त १०० रुपये घेऊन, शाहरुखने दिल्ली सोडली आणि मनात अनेक स्वप्ने घेऊन मुंबई गाठली.

वांद्रे येथील एक किस्सा
एकदा तर शाहरुख वांद्रे स्टेशनजवळील लकी नावाच्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभा होता आणि आकाशाकडे बघत तो जोरात ओरडला ‘मी तुला एक दिवस जिंकून घेईन’. तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे, शाहरुख खानने लोकांसमोर असा आदर्श ठेवला की आजची पिढी त्याला आपला आदर्श मानते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post