Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार शाहरुख खान? लेटेस्ट टीझरमध्ये तुम्हाला दिसला का अभिनेता?

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार शाहरुख खान? लेटेस्ट टीझरमध्ये तुम्हाला दिसला का अभिनेता?

मंगळवारी (३१ मे) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चा नवीन टीझर समोर आला आहे. या टीझरमधून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या सगळ्याशिवाय, टीझर रिलीज झाल्यानंतर आणखी एक नाव खूप चर्चेत आहे. ते नाव आहे बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan).

होय! टीझर समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की त्यात शाहरुख खान देखील आहे आणि तो या चित्रपटात एक छोटी भूमिका करताना दिसणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मग शाहरुखच्या नावाची चर्चा का होत आहे. चला जाणून घेऊया. (shahrukh khan in ranbir kapoor film brahmastra have you seen in teaser)

…म्हणून चर्चेत आहे शाहरुख
खरं तर, टीझरमध्ये एक लांब केस असलेला माणूस दिसत आहे. जो हातात त्रिशूळ घेऊन लाल चमकणाऱ्या दगडाजवळ उभा आहे. त्या व्यक्तीचे लांब केस आणि शरीराची रचना पाहून सोशल मीडिया युजर्स ती व्यक्ती दुसरी कोणी नसून शाहरुख खान असल्याचे सांगत आहेत.

‘या’ भूमिकेत दिसेल अभिनेता
तसे तर, शाहरुख ‘ब्रह्मास्त्र’मध्ये असल्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. मात्र टीझर समोर आल्यानंतर तो या चित्रपटात असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, या चित्रपटात शाहरुख एका शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि तो ३० मिनिटांचा कॅमिओ रोल असेल. मात्र, यात कितपत तथ्य आहे, हे निर्मात्यांचे विधान आल्यानंतरच स्पष्ट होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा