Thursday, June 13, 2024

किंग खानचा जलवा कायम! ‘जवान’ने मारली ‘इतक्या’ कोटींची मजल; एकदा वाचाच

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘जवान‘ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाने जगभरात 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तो 800 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे. ‘जवान‘ हा एक एक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाने भारतात आणि परदेशातही चांगली कमाई केली आहे.

भारतात चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘जवान‘ (Jawan Movie) या चित्रपटाच्या यशामुळे शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर आणखी एक विक्रम केला आहे. तो आता शाहरुख खानच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात 797.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. ही माहिती चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस रेड चिलीज एंटरटेनमेंटने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामद्वारे दिली आहे.

‘जवान’ने 11 व्या दिवशी 34.5 कोटींची कमाई केली होती. आता हा चित्रपट रिलीजच्या 12व्या दिवशी 14 कोटींची कमाई करू शकतो. जर जवानाने 12व्या दिवशी 14 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खानचा जवान केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली कमाई करत नाही, तर त्याचे ओटीटी राईट्स देखील कोटींमध्ये विकले गेले आहेत. शाहरुख खानने 2023 साली आपल्या शानदार पुनरागमनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या पठाण या चित्रपटाने पहिल्यांदा जगभरात 500 कोटींची कमाई केली होती.

‘जवान’ बद्दल बोलायचे तर, हा चित्रपट एका बाप आणि मुलाची कथा सांगणारा आहे. यातील शाहरुखचा डबल रोल लोकांना खूप आवडला आहे. वडिलांच्या भूमिकेतही शाहरुखचा स्वॅग स्पष्ट दिसत होता. चित्रपटात राजकीय आणि सामाजिक पैलू दाखवण्यात आले आहेत. एटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर, नयनतारा या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. शाहरुख खान आणि नयनतारा ‘जवान’मधून पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले आहेत. (Shahrukh Khan Jawaan earned 800 crores in 10 days)

अधिक वाचा-
अभिनेत्री कोमल कुंभारचा खास लूक व्हायरल; पाहा व्हिडिओ
50शी ओलांडूनही उर्मिला मातोंडकरचा फिट आणि ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल

हे देखील वाचा