Monday, September 25, 2023

शाहरुख खानच्या ‘जवान’ची अखिलेश यादवांना पडली भुरळ; म्हणाले, ‘जो ज़िंदा हो तो फिर…’

शाहरुख खानने आपणच बॉलिवूडचा किंग खान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘पठाण‘नंतर त्याचा ‘जवान‘ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘जवान’ने अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग मिळवली. ‘जवान’ची प्रचंड क्रेझ वाढली आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

शाहरुख खानचा ‘जवान’ (jawan) चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जवानाचा प्रत्येक शो हाऊस रोज फुल होत आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. आता यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शाहरुख खानचे कौतुक केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाबाबत ट्विट केले आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट करताना लिहिले की, “‘जवान’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच जबाबदारीचा संदेश देतो. खर्‍या अर्थाने देशातील जनतेमध्ये जागृती आणण्याचे आवाहन आहे. सिनेमा आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून आणि वेळोवेळी आपली उपयुक्तता सिध्द करून देशाला कसा पुढे नेऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे ‘जवान’.सिनेमाची प्रेक्षकांमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून सर्व विक्रम मोडीत काढत आहे.”

तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “देशाची विचारसरणी किती पुरोगामी आहे, हे यावरून दिसून येते आहे. हे किती सकारात्मक आहे. चित्रपटातील सर्व कलाकार, लेखक-दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांचे अभिनंदन… असेच अर्थपूर्ण चित्रपट बनवत रहा. जो जिन्दा हो तो फिर जिन्दा नाजर आना ज़रूरी है!”

 ‘जवान’ने रिलीज होताच कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 65.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 46.23 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 68.72 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांची एकूण कमाई 180.45 कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय तामिळ आणि तेलुगूने पहिल्या दिवशी 75 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Shahrukh Khan Jawaan shared tweet of Akhilesh Yadav fascination)

अधिक वाचा-
सूरज पांचोली लवकरच अडकणार विवाहबंधनात? अभिनेता म्हणाला, ‘ती खूप सुंदर आहे…’
आदिनाथ कोठारे डॅशिंग आवतारात; अभिनेत्याचा रॅपर स्वॅग सोशल मीडियावर चर्चेत

हे देखील वाचा